मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि मुलगी सारा अली खान यांच्यात बाप-लेकीच्या पुढे मित्र-मैत्रिणीचं नातं आहे. सारा कायम तिच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सैफ म्हणजे तिच्या अब्बूंना भेटण्यासाठी जाते. सैफची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर खानसोबत देखील साराचं चांगलं नातं आहे. फेब्रुवारीमध्ये करीनाने तिच्या दुसऱ्या मुलाला जन्म दिला. तेव्हा करीना आणि सैफला शुभेच्छा देण्यासाठी सारा त्यांच्या घरी पोहोचली. करीना आणि सैफने अद्याप तैमूरच्या छोट्या भावाची झलक दाखवलेली नाही.
पण एका मुलाखती दरम्यान साराने छोटा नवाब कसा आहे, याचा खुलासा केला. यावेळी साराने सैफची खिल्ली देखील उडवली. सैफ आणि करीनाचे चाहते त्यांच्या छोट्या मुलाला पाहाण्यासाठी उत्सुक आहेत. छोट्या नवाबचा फोटो कधी समोर येईल हे कोणाली माहिती नाही. पण साराने छोट्या नवाबबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
छोट्या भावाबद्दल सारा म्हणाली, जेव्हा त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा हसला. त्याचा तो चेहरा पाहून मी त्याचं ठिकणी त्याच्या प्रेमात पडली. तो पूर्णपण क्यूटनेसचा बॉल आहे. दरम्यान करीनाने तिच्या छोट्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, पण त्यामध्ये छोट्याचा चेहरा पूर्ण दिसला नाही. पण साराच्या म्हणण्यानुसार छोटा नवाब देखील फार क्यूट असेल, यात काही शंका नाही.
मुलाखतीत साराने तिच्या वडिलांबद्दल देखील मजेशीर खुलासा केला. सारा म्हणाली, 'मी कायम माझ्या वडिलांसोबत मस्करी करते. मी त्यांना म्हणते.. तुम्ही फार लकी आहेत, तुम्हाला प्रत्येक दशकात एक बाळ झालं आहे. 20, 30, 40, 50मध्ये देखील. हे बाळ माझे वडील सैफ आणि करीना यांच्या आयुष्यात आनंद घेवून आलं आहे. त्यांच्यासाठी मी आनंदी आहे.'
साराच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सारा लवकरचं 'अतरंगी रे' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटत तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार आणि धनुष देखील दिसणार आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.