'तुम्ही लोकं जवळ येवू नका' सारा का म्हणाली असं?

साराच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण आता तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे..      

Updated: Apr 10, 2021, 01:30 PM IST
'तुम्ही लोकं जवळ येवू नका' सारा का म्हणाली असं?  title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान कायम सोशल मीडियावर सक्रीय असते. 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यामातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. फार कमी काळात तिने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. तिच्या स्वभावामुळे तिला अनेक जण पसंत करतता. पण आता केलेल्या कृत्यामुळे सारा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याला कारण देखील तसचं आहे. 

सारा कायम तिचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. कोरोनाचा वाढता संसर्ग असला तरी ती फिटनेसकडे दुर्लक्ष करत नाही. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साराचे काही जिमबाहेरील फोटो पोस्ट केले आहेत. सारा जिम बाहेर आल्यानंतर पैपराजी फोटोसाठी तिच्या जवळ गेले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्यावेळी साराने 'तुम्ही लोकं जवळ येवू नका' असं म्हणाली. साराने मास्क न घातल्यामुळे ती फोटोग्राफर्सना जवळ येण्यापासून रोखत होती. तिच्या वाक्यामुळे सारा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. साराने मास्क न घातल्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. तिच्या फोटोंवर अनेक कमेंट येत आहेत.

एका एका युजरने म्हंटलं आहे, 'ही लोकांना मास्क घालायला आणि सोशल डिन्स्टसिंग शिकवते,' तर दुसऱ्या युजरने तुझा मास्क कुठे असा प्रश्न विचारला आहे. सध्या सारा हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण तिला ट्रोल करत आहे.