'ये है हिंदुस्तान की आवाज...', Sara Ali Khan च्या Ae Watan Mere Watan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Sara Ali Khan च्या या आगामी चित्रपटासाठी सगळेच उत्साही आहेत. साराची एक वेगळी झलक चाहत्यांना पाहता येणार आहे. 

Updated: Jan 23, 2023, 01:33 PM IST
'ये है हिंदुस्तान की आवाज...', Sara Ali Khan च्या Ae Watan Mere Watan चित्रपटाचा टीझर प्रदर्शित  title=

Sara Ali Khan Movie : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही नेहमीच चर्चेत असते. साराला कोणत्याही ओळखीची गरज नाही. साराचा गोड स्वभाव आणि तिची अवखळ वृत्ती नेहमीच सगळ्यांचे लक्ष वेधते. आता सारा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. सारा अली खान आता तिच्या आगामी चित्रपटात या तिच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध भूमिका साकारणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव 'ए वतन मेरे वतन' (Ae Watan Mere Watan) असे आहे. आज तिच्या या चित्रपटाचा पहिला लूकसमोर आला आहे. चित्रपटाचा छोटा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून साराचा लूक आणि तिच्या भूमिकेनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. (Ae Watan Mere Watan Teaser) 

साराचा हा आगामी चित्रपट अॅमेझॉन प्राइम (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 23 जानेवारी म्हणजे आज प्राइम व्हिडीओच्या युट्यूब अकाऊंटवरून साराच्या 'ऐ वतन मेरे वतन' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तुम्ही पाहू शकता की सारा एका रुममध्ये स्वत: ला बंद करून घेते आणि बोलते 'अंग्रेजों को लग रहा है कि उन्होंने क्विट इंडिया का सिर कुचल दिया है. लेकिन आजाद आवाजें कैद नहीं होती. ये है हिंदुस्तान की आवाज है, हिंदुस्तान में कहीं से, कहीं पे हिंदुस्तान में.' त्यानंतर अचानाक दरवाजावर कोणी तरी जोर जोरात ठोठावतं. हे पाहून सारा घाबरते हे आपण टीझरमध्ये पाहिलं. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना वाटत आहे की सारा ही फ्रीडम फाइटरची भूमिका साकरत आहे. (Sara Ali Khan Upcoming Movie)

हेही वाचा : Athiya Shetty and KL Rahul Love Story : ती भेट, मैत्री आणि प्रेम... अथिया आणि केएल राहुलची लव्ह स्टोरी

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

खरं तर 'ए वतन मेरे वतन' या चित्रपटात सारा अली खान भारताची महिला स्वातंत्र्य सेनानी (Freedom Fighter) उषा मेहता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सीक्रेट रेडिओ सेवेच्या माध्यमातून 1942 मध्ये मुंबईच्या गोवालिया टँक मैदानात सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनात उषा मेहता यांची महत्त्वाची भूमिका होती. आता साराला अशा भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. दरम्यान, हा चित्रपट फक्त 'ए वतन मेरे वतन' केवळ OTT प्लॅटफॉर्म Amazon Prive व्हिडिओवर प्रदर्शित होईल. दरम्यान, सारा अली खान ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिनं देखील इन्स्टाग्रामवर चित्रपटाचा टीझर शेअर करत ही भूमिका साकारण्यासाठी आणि ही कथा सगळ्यांसमोर मांडण्यासाठी ती उत्सुक असल्याचे म्हटले आहे.