मंदिराच्या बाहेर जेवणाची पाकिटं वाटताना दिसली सारा अली खान, कॅमेरे पाहताच संतापली अभिनेत्री

Sara Ali Khan : सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पापाराझींवर का संतापली सारा एकदा पाहाच...

दिक्षा पाटील | Updated: Mar 31, 2024, 02:24 PM IST
मंदिराच्या बाहेर जेवणाची पाकिटं वाटताना दिसली सारा अली खान, कॅमेरे पाहताच संतापली अभिनेत्री title=
(Photo Credit : Social Media)

Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या चित्रपटांशिवाय कामासाठी देखील ओळखली जाते. सारा कधीही कोणत्या सेलिब्रिटी सारखी राहत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं. ती एखाद्या सर्वसामान्य व्यक्ती सारखी राहताना दिसते. अनेकदा आपण तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहतो त्यात कुठे फिरायला गेल्यानंतर लग्झरीयस हॉटेल न निवडता ती तिथे असलेल्या एखाद्या झोपडीत राहते तिथल्याच लोकांसोबत गप्पा मारते त्यांच्याच इथे जेवते देखील. आता रमजानचा महिना सुरु झाला असून सारा गरजूंची मदत करताना दिसली आहे. मात्र, यावेळी सारा पापाराझींवर संतापल्याचे पाहायला मिळते. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सारा अली खानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शूट केला आहे. या व्हिडीओत पाहायला मिळत आहे की सारा ही कॅज्युअल कपड्यांमध्ये आहे. तर ती खाण्याचे काही पॅकेड वाटताना दिसते. या दरम्यान, पापाराझी तिचा व्हिडीओ शूट करत आहेत हे पाहून ती त्यांच्यावर चिडली. तिचा या सगळ्याला नकार होता. तिचं म्हणणं होतं की तिला कोणी शूट करु नका. सारा यावेळी तिला शूट करत असलेल्या पापाराझींवर चिडून म्हणाली की कृपया, नका करु. तिला अशी विनंती करताना पाहून तिच्या आजूबाजुला असलेल्या महिला देखील पापाराझींवर संतापल्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : लग्नात बूट लपवल्यानंतर रणबीरनं आलियाच्या बहिणीला दिले लाखो रुपये? किस्सा ऐकून कपील शर्मांच्या सेटवर सारेच थक्क

कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा मर्डर मुबारक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. त्याशिवाय तिचा 'ऐ वतन मेरे वतन' हा चित्रपट देखील नुकताच अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तर साराकडे आणखी अनेक प्रोजेक्ट्स आहेत. त्याविषयी बोलायचे झाले तर त्यात 'मेट्रो... इन दिनों' हा एक चित्रपट आहे. त्याशिवाय 'स्काई फोर्स' हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून संदीप केवलानी यांनी या चित्रपटाती पटकथा लिहिल आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करणार आहेत. अक्षय कुमार, वीर पहाडिया, निम्रत कौर देखील आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. त्याशिवाय साराजवळ आणखी एक प्रोजेक्ट असून त्याविषयी आणखी माहिती समोर आलेली नाही.