संजय त्याच्या मुलांना देवू इच्छितो सामान्य जीवन

अभिनेता संजय दत्त त्याच्या मुलांवर कोणत्याही प्रकारचा ताण  लादत नाही. 

Updated: May 7, 2019, 07:28 PM IST
संजय त्याच्या मुलांना देवू इच्छितो सामान्य जीवन title=

मुंबई : आताच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालक त्यांच्या पाल्याच्या करियरच्या चिंतेत असतो. त्यामुळे मुलांवर अनेक प्रकारचे दबाव लादण्यात येतात. पण अभिनेता संजय दत्त त्याच्या मुलांवर कोणत्याही प्रकारचा ताण मुलांवर लादत नाही. काही दिवसांपूर्वी शाहरान आणि इकरा यांनी आंतर-शाळा जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. संजय दत्त आणि पत्नी स्वत: या खेळात दिग्गज आहेत. हे जोडपे आपल्या मुलांनी सामान्य जीवन जगू इच्छित आहेत. त्यांच्यावर स्टार्स किड्स असण्याचा प्रभाव पडूनये या करीता ते प्रयत्नशील आहेत.

संजय दत्तचा नुकतंच 'कलंक' चित्रपटगृहात दाखल झाला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण प्रेक्षक आणि समीक्षकांना त्यांच्या सर्व  प्रभावशाली आणि सशक्त कामगिरीसाठी भरपूर कौतुक केले.        

संजय सध्या त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात अत्यंत व्यस्त आहे. या वर्षी त्याचे आणखी दोन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ऐतिहासिक कथेवर आधारलेल्या एका चित्रपटात तो भूमिका साकारताना दिसणार आहे. 

सध्याच्या काळात संजय व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. 'शमशेर', 'पानिपत', 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया', 'प्रस्थानम' आणि 'सडक 2' या चित्रपटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.