मुंबई : 'फनी' चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका ओडिशा आणि पश्चिम बंगाल या २ राज्यांना मोठ्या प्रमाणात बसला. या वादळात लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. पण आता त्यांच्या मदतीसाठी अनेक मंडळी मदतीचा हात पुढे करत आहे. अभिनेता खिलाडी अक्षय कुमारही 'फनी' चक्रीयवादळाने प्रभावित झालेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने येथील कुटुंबियांना १ कोटी रूपयांची मदत दिली आहे. अक्षयने ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे. त्याचप्रमाणे अक्षयने देशातील लोकांना शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन केले आहे.
तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा हे देखील चक्रीयवादळाने प्रभावित लोकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. 'दलाई लामा ट्रस्ट'च्या माध्यमातून १० लाख रूपयांची मदत त्यांनी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितानुसार, छत्तीसगडच्या सरकारने ११ कोटी रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूच्या सरकारने प्रत्येकी १० कोटींची मदत दिली आहे. तर उत्तराखंड सरकारने ५ कोटी रूपयांची मदत केली आहे.
काही दिवसांपूर्वी 'फनी' चक्रीयवादळाचा ओडिशाच्या सागरी किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला. या वादळाचा वेग ताशी २२५ किमी एवढा होता. वैज्ञानिकांच्या आणि सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. पण या वादळामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. केले आहे. तर ३५ जणांचा मृत्यू झाला.