'या' राजकीय नेत्याच्या बायोपिकसाठी सुशांत राजपूत माझ्या नजरेत होता- राऊत

पडद्यावरचा संभाव्य 'जॉर्ज' पडद्याआड गेला.

Updated: Jun 28, 2020, 10:14 AM IST
'या' राजकीय नेत्याच्या बायोपिकसाठी सुशांत राजपूत माझ्या नजरेत होता- राऊत title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत Sushant singh rajput  याला घेऊन मला जॉर्ज फर्नांडिस यांचा चरित्रपट george fernandes biopic साकारायचा होता, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. यानंतर बॉलिवूड इंडस्ट्री, घराणेशाही Nepotisim आणि सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांवरून मोठे वादळ उठले होते. या सगळ्यावर संजय राऊत यांनी 'सामना'तील रोखठोक या सदरातून भाष्य केले आहे. 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी यशराज फिल्म्समधील महत्त्वाच्या व्यक्तीची चौकशी

यामध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूतला घेऊन आपण चित्रपट करण्याच्या विचारात होतो, असे सांगितले. सुशांतने 'धोनी' M.S. Dhoni: The Untold Story चित्रपटात महेद्रसिंग धोनीची भूमिका केली. हा चित्रपट खूप गाजला. 'ठाकरे' चित्रपटाची निर्मिती संपल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर बायोपिक करण्याचे ठरले. जॉर्ज यांचे चेहरे म्हणून ज्या दोन-तीन अभिनेत्यांची नावे समोर आली त्यात सुशांतचे नाव होते. धोनीमुळे तो माझ्या नजरेत होता, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

SRS Suicide : या प्रकरणात मुंबई पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती

मात्र, दोन दिवसांनी मला सांगण्यात आले, सुशांत उत्तम अभिनेता आहे. तो ही भूमिका लीलया पेलेल, पण सध्या त्याची मानसिक अवस्था चांगली नाही. तो डिप्रेशनमध्ये आहे. चित्रपटांच्या सेटवर त्याचे वर्तन तऱ्हेवाईक आहे. याचा त्रास सगळ्यांना होतोय. याच कारणामुळे अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसनी त्याच्याशी करार मोडले आहेत. सुशांतने स्वत:च स्वत:च्या करिअरची वाट लावली, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यानंतर दोन महिन्यांत सुशांतच्या आत्महत्येची बातमी आली. त्यामुळे पडद्यावरचा संभाव्य 'जॉर्ज' पडद्याआड गेला, असे संजय राऊत यांनी सांगितले.