कामाठीपुऱ्यात लहानपणी जे पाहिलं ते अद्याप विसरले नाहीत संजय लीला भंसाळी, 'अवघ्या 20-20 रुपयांत…'

Sanjay Leela Bhansali Birthday : संजय लीला भंसाळी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक चित्रपट दिलेत. ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धमाल केली. तर चित्रपट एवढे उत्कृष्ट होते की त्यांनी कायमसाठी मनावर छाप पाडली. 

नेहा चौधरी | Updated: Feb 24, 2024, 12:05 AM IST
कामाठीपुऱ्यात लहानपणी जे पाहिलं ते अद्याप विसरले नाहीत संजय लीला भंसाळी, 'अवघ्या 20-20 रुपयांत…' title=
Sanjay Leela Bhansali still hasn forgotten what he saw as a child in Kamathipura For just 20 20 rupees Sanjay Leela Bhansali Birthday special

Sanjay Leela Bhansali Birthday : बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांच्या यादीत नावाजलेल नाव म्हणजे संजय लीला भंसाळी त्यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. प्रत्येक निर्मात्याची स्वत:ची अशी सिग्नेचर स्टाइल असते. तशी भंसाळी यांचीही एक हटके स्टाइल आहे, मोठं बजेट, भव्य दिव्य जग आणि अंधकारमय जगात जगणाऱ्या व्यक्ती वेदनादायी कहाणी ते जगासमोर आणायचे. चंद्रमुखीपासून गंगूबाईपर्यंत प्रत्येक व्यक्तिरेखा ही प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुतली. तुम्ही त्यांच्या चित्रपटातील एका गोष्टच निरीक्षण केलं का? त्यांनी रेड लाइट एरियामधील महिलांचे दु:ख त्यांच्या प्रत्येक चित्रपटातून दाखवलं. यामागील कारण जाणून तुमचं हृदय हलावून जाईल. 

संजय यांनी मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं. त्यांच्या प्रत्येक चित्रपटात रेड लाईट एरियामधील एकतरी पात्र का असतं...यामागील खरं कारण म्हणजे दिग्दर्शकाचं बालपण हे मुंबईतील प्रसिद्ध अशा कामाठीपुराजवळील चाळीत गेलं आहे. त्यामुळे रेड लाईट एरियातील या महिलांचं दु:ख आणि वेदना त्यांनी जवळून पाहिलं आहे. 

त्यांनी सांगितलं की, लहानपणी रेड लाईट एरिया बाजूला राहताना अशा अनेक घटना घडल्याचा ज्याचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. मी देहविक्री करणाऱ्या महिलांना 20 ते 50 रुपयांमध्ये स्वत:ला विकताना पाहिलं. हे पाहिल्यावर मला एकच प्रश्न हलवून सोडायचा की एका व्यक्तीची किंमत ही 20 रुपये कशी असू शकतं? या गोष्टीने आजही वेदना होते आणि मरेपर्यंत ही गोष्ट मी विसरु शकतं नाही, असं संजय लीला भंसाळी यांनी सांगितलं. 

जेव्हा संजय लीला भन्साळी हे लहानपणी शाळेत ये जा करायचे तेव्हा त्यांना कामाठीपुरामधील रेड लाईट एरियातून जावं लागायचं. ''तिथेल्या गोष्टी आणि वातावरण पाहून त्यांच्यावर मनावर खोलवर परिणाम झाला. हीच गोष्ट ते आपल्या चित्रपटातून प्रेक्षकांना सांगायचा प्रयत्न करतात. पावडर, लिपस्टिक, टिकली आणि चमकदार कपड्यांमागील त्यांच्या वेदना कोणाला जाणवतात का? की त्या फक्त उपभोगण्याची वस्तू आहे. त्या वयात मला ते ना समजायचं ना मला कोणाला शब्दात काही सांगता येत होतं.''

मी त्यांच्या वेदना चंद्रमुखी आणि गंगूबाईच्या माध्यमातून पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. ते इथेच थांबले नाही आता OTT वर ते या देहविक्री करणाऱ्या महिलांच्या वेदनेची कहाणी घेऊन येत आहे. या चित्रपटाचं नाव आहे हिरामंडी. हा चित्रपट दिग्दर्शकाच्या ड्रीम प्रोजेक्ट असल्याच बोल जातं. या हिरामंडीमध्ये सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, संजीदा शेख, रिचा चड्डा हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा पाकिस्तानी रेड लाईट एरियाभोवती असल्याच म्हटलं जातं. 

संजय लीला भन्साळी यांचं बालपण अतिशय कठीण प्रसंगात गेलं. त्यांची आई रोज साडीला फॉल्स लावून घराचा घराचा रोडगा सांभाळायची. कधी 4 तर 12 साड्या मिळायच्या. त्या काळात एका साडीला एक रुपया त्यामुळे कधी कधी उपाशीपोटी झोपण्याची वेळ याची.