नशेत संजूबाबा घुसला श्रीदेवी यांच्या रुममध्ये त्यानंतर घडल ते अत्यंत धक्कादायक

नशेत संजूबाबा रुममध्ये घुसल्यानंतर श्रीदेवी यांना घ्यावा लागला मोठा निर्णय... प्रसंग ऐकून तुम्हालाही बसेल धक्का  

Updated: Jun 13, 2022, 10:04 AM IST
नशेत संजूबाबा घुसला श्रीदेवी यांच्या रुममध्ये त्यानंतर घडल ते अत्यंत धक्कादायक title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता, जो आजही चर्चेत आहे. बॉलिवूडमधील सोनेरी दिवस म्हणजे 90 दशक. आजही असे काही सेलिब्रिटी आहेत, ज्यांचे अनेक किस्से चर्चेत असतात. सध्या संजूबाबा म्हणजे अभिनेता संजय दत्त  बद्दल एक मोठ सत्य समोर आलं आहे. हा किस्सा आहे एका प्रसिद्ध अभिनेत्री संबंधीत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आहेत. 

श्रीदेवींच्या सौंदर्यामागे फक्त चाहतेच नाही, तर प्रसिद्ध अभिनेते देखील श्रीदेवी फिदा होते. संजय दत्त देखील अशाच अभिनेत्यांपैकी एक आहे, परंतु संजूबाबाने एकदा असं कृत्य केले, ज्यामुळे श्रीदेवी त्याच्यावर रागावल्या आणि नंतर संजयसोबत कधीही काम न करण्याची शपथ घेतली.

हा किस्सा आहे हिम्मतवाला सिनेमाच्या शूटिंग सेटवरचा. तेव्हा श्रीदेवी प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होत्या, तर संजय दत्त इंडस्ट्रीत स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत होता. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजयला श्रीदेवी इतक्या आवडल्या की, जेव्हा त्याला कळलं श्रीदेवी मुंबईत शूटिंग करत आहेत. तेव्हा तो स्वत:ला रोखू शकला नाही आणि सेटवर अभिनेत्रीला भेटायला गेला.

संजय दत्त दारूच्या नशेत सेटवर पोहोचला तेव्हा त्याला श्रीदेवी दिसल्या नाहीत. तेव्हा संजूबाबू थेट श्रीदेवी यांच्या रुममध्ये पोहोचला.  संजयने खोलीत प्रवेश करताच श्रीदेवी घाबरून ओरडू लागल्या आणि प्रचंड गोंधळ झाला. 

त्यादिवशी श्रीदेवी यांनी ठरवले की त्या पुन्हा संजयसोबत काम करणार नाहीत. संजय लोकप्रिय झाल्यावर दोघांनाही एका सिनेमात कास्ट करण्यात आलं, पण सिनेमा कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही. 

त्यानंतर पुन्हा नशिबाने 'गुमराह' सिनेमात दोघांना एकत्र आणलं. सेटवर दोघांमध्ये कधीच बोलणं झालं नाही, पण जेव्हा सिनेमा तयार झाला तेव्हा दोघांनाच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.