Samantha's Cryptic Post After Naga Chaitanya and Sobhita Dhulipala's Wedding : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपालानं हैदराबादमध्ये तेलगु परंपरेनुसार सप्तपदी घेतल्या. त्यांच्या लग्नाच्या भव्यदिव्य सोहळ्यानं सगळ्यांचे लक्ष वेधले. तर हा विवाहसोहळा त्यांच्या कुटुंबाचा स्टुडियो अन्नपूर्णामध्ये झालं. नागा चैतन्यचे आजोबा आणि लोकप्रिय तेलगू चित्रपटसृष्टीतील अभिनेता अक्कीनेनी नागेश्वर राव यांनी या प्रतीचे अनावरण केल्यानंतर त्यांच्या घरात किंवा स्टुडियोमध्ये झालेला हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचं आयोजन हे याच स्टुडियोमध्ये करण्यात आले. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तर दुसरीकडे नागा चैतन्यच्या पूर्वाश्रमीची पत्नी समांथानं एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या दोघांच्या लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
समांथानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ हॉलिवूड आयकन वायओला दाविसनं शेअर केला होता. यात एक मुलगी आणि एक मुलात रेसलिंग मॅच सुरु असते. सुरुवातीला मुलगा हा कॉन्फिडन्सनं मॅचच्या सुरुवातीला एन्ट्री घेतो. पण त्यानंतर मुलगी ही मॅच जिंकते. हा व्हिडीओ शेअर करत समांथानं कॅप्शन दिलं की 'फुलासारखं नाजूक नाही तर, बॉमसारखी नाजुक #FightLikeAGirl'. त्यानंतर तिनं पुढे म्हटलं की 'मुलीसारखं लढ.'
समांथानं ही पोस्ट तेव्हा केलीये जेव्हा तिचा पुर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत सप्तपदी घेतल्या. खरंतर नागा चैतन्यचे वडील आणि अभिनेता नागार्जुननं सोशल मीडियावर त्या दोघांच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर समांथानं ती पोस्ट शेअर केली आहे.
हेही वाचा : Pushpa 2 : प्रदर्शनाच्या काही तासात 'पुष्पा 2' LEAK; निर्मात्यांना बसणार कोट्यावधींचा फटका
दरम्यान, समांथा आणि नागा चैतन्य यांनी 2017 मध्ये सप्तपदी घेतल्या. त्या दोघांचं लग्न हे चांगलंच चर्चेत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळतात. पण काही वर्षांनंतर 2021 मध्ये त्यांनी घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनं त्या दोघांच्या चाहत्यांना दु:ख झालं होतं. समांथाच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती नुकतीच हनी बनी या वेब सीरिजमध्ये दिसली. यात ती वरुण धवनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.