Samantha ला अशा परिस्थितीत पाहून चाहत्यांना बसला धक्का!

Samantha Ruth Prabhu : समांथा रुथ प्रभूनं तिच्या सोशल मीडियावरून शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोंपैकी एका फोटोत समांथाला रुग्णालयात पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्काबसला आहे तर तिच्या चाहत्यांची चिंता देखील वाढली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 27, 2023, 05:41 PM IST
Samantha ला अशा परिस्थितीत पाहून चाहत्यांना बसला धक्का!  title=
(Photo Credit : Samantha Ruth Prabhu Instagram)

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही सध्या तिच्या शाकुंतलम चित्रपटामुळे चर्चेत आहे. समांथा ही सोशल मीडियावर तिच्या सिटाडेल या सीरिजमुळे चर्चेत आहे. तर सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या समांथाचे लाखो चाहते आहेत. समांथा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संपर्कात राहते. सध्या सोशल मीडियावर समांथानं काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधून समांथान तिच्या रुग्णालयात जाण्यापासून, ट्रॅव्हल करण्यापर्यंत, सेटवरील आणि आणखी काही वर्कआऊट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तर नेटकऱ्यांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये समांथाचा पहिला फोटो आहे. त्यानंतर तिचे श्वान, समांथाचा रुग्णालयातील फोटो, घोडेस्वारी करताना समांथा, डेजर्ट, त्यानंतर जाहिरातीतील तिचा फोटो, वर्कआऊट करताना समांथा असे अनेक फोटो समांथानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. तर या फोटोंमधून एक गोष्ट कळली आहे की समांथा ऑटोइम्यूनसाठी 'हाइपरबेरिक थेरेपी' घेत होती. तेव्हाचा हा फोटो आहे. समांथाचा हा फोटो पाहून सगळ्यांना धक्काबसला आहे. पण तिचा हा फोटो आताचा नाही तर आधीचा म्हणजेच जेव्हा ती थेरपी घेत होती तेव्हाचा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सगळ्यात शेवटी समांथानं रवींद्रनाथ टागोर यांचं एक कोट शेअर केलं आहे. यात ते म्हणाले, जी व्यक्ती एक झाडं लावते,हे माहित असतानाही की त्या झाडाच्या सावलीत त्याला बसता येत नाही. त्यानं कमीत कमी जीवनाचा अर्थ समजण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, तिच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तिला 'योद्धा' म्हटले आहे. 

हेही वाचा : साडीनं पेट घेतला म्हणून... नाहीतर 'ही' अभिनेत्री असती 'बाजीराव'ची 'मस्तानी'

समांथाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर नुकताच प्रदर्शित झालेला तिचा शाकुंतलम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करु शकला नाही. तर ती सध्या सिटाडेल या तिच्या आगामी सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर या सीरिजचे दिग्दर्शन राज एंड डीके हे करणार आहेत. समांथा आणि वरुण धवन हे दोघं या सीरिजच्या निमित्तानं स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. याशिवाय समांथाकडे आणखी एक तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटात समांथा लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. तर या चित्रपटाचं नाव 'कुशी' असल्याचे म्हटलं जातं.