वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर सलमानच्या आईसोबत 4 भावंडांवर दु:खाचा डोंगर

नात्यांच्या पेचात अडकला सलमान, वडिलांचा करु लागलेला राग ; पाहा काय होती अवस्था..  

Updated: Mar 26, 2022, 12:08 PM IST
वडिलांच्या दुसऱ्या लग्नानंतर सलमानच्या आईसोबत 4 भावंडांवर दु:खाचा डोंगर title=

मुंबई : अभिनेता सलमान खान प्रमाणे त्याचं कुटुंब देखील कायम चर्चेत असतं. सलमान खानचे वडील सलीम खान यांचं देखील खासगी आणि प्रोफेशल आयुष्य कायम चर्चेत राहिलं. खान कुटुंबावर एक वेळ अशी आली होती, ज्यामुळे सलमानची आणि भावंडांवर कठीण परिस्थिती ओढावली होती. ती वेळ होती जेव्हा सलीम खान यांनी दुसरं लग्न केलं. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी हेलन यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. पण जेव्हा सलीम यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल त्यांच्या पहिल्या पत्नीला कळालं तेव्हा खान कुटुंब चर्चेत आलं.

सलीम खान आणि सलमानची आई सुशीला चरक यांचं लग्न 1964 साली झालं. लग्नानंतर सुशीला यांनी धर्म बदलला आणि स्वतःचं नाव सलमा ठेवलं. सलमा आणि सलीम यांना   अलविरा, अरबाज, सलमान आणि सोहेल अशी 4 मुलं आहेत. 

सलीम यांनी 1981 साली हेलन यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. जेव्हा सलीम यांनी दुसरं लग्न केलं, तेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नीला आणि 4 मुलांना मोठा धक्का बसला. सलीम यांच्या पहिल्या पत्नीने सांगितलं की, 'सलीम यांच्या दुसऱ्या लग्नानंतर सर्वांना धक्का बसला होता. पण वेळेनुसार सर्व काही ठिक झालं...'

हेलन यांना खान कुटुंबाने मान्य केलं आणि आज सलमा आणि हेलन दोघी एकत्र राहतात. हेलन आणि सलीम यांनी कधी स्वतःच्या मुलांचा विचार न करताा अर्पिताला दत्तक घेतलं.