शूटींग पूर्ण करून परतत असताना सलमानने केले खास ट्विट...

दबंग खान याच्या 'टाइगर जिंदा है' या चित्रपटाचे शूटींग आबू दाबी येथे सुरु होते. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 15, 2017, 02:14 PM IST
शूटींग पूर्ण करून परतत असताना सलमानने केले खास ट्विट...  title=

नवी दिल्ली : दबंग खान याच्या 'टाइगर जिंदा है' या चित्रपटाचे शूटींग आबू दाबी येथे सुरु होते. शूटींग दरम्यानचे किस्से, ऑफस्क्रीन मज्जा मस्ती याचे अपडेट्स सलमान, कतरिना आणि अली अब्बास जफर हे वारंवार सोशल मीडियावर शेयर करत होते. मात्र आता शूटींग संपवून सगळी टीम पुन्हा भारतात परतत आहे. यावेळेस सलमानने ट्विट केले, "टाइगर जिंदा है साठी ५० दिवसांचे शेड्युल पूर्ण करून अबू दाबीतून निघत आहोत. हा संपूर्ण प्रवास खूप सुंदर होता.''

अबू धाबीच्या वेगवेगळ्या भागात या चित्रपटाचे शूटींग ४ मे पासून सुरु झाले होते. यशराज फिल्म्सचा ब्लॉकब्लास्टर चित्रपट 'एक था टाइगर' या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. 

अबू धाबीच्या वेगवेगळ्या भागात या चित्रपटाचे शूटींग ४ मे पासून सुरु झाले होते. यशराज फिल्म्सचा ब्लॉकब्लास्टर चित्रपट 'एक था टाइगर' या चित्रपटाचा हा सीक्वल आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात सलमान आणि कतरिना ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. 
'एक था टाइगर', 'युवराज', 'मैंने प्यार क्यों किया?' आणि 'पार्टनर' या चित्रपटातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.