नवी दिल्ली : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. जोधपूरच्या न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. या निकालानंतर सलमान खान जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवाना झाला आहे.
सलमानला झालेल्या शिक्षेमुळे मी निराश झाली आहे. त्याला दिलासा मिळायला हवा होता. सलमाननं खूप सामाजिक कार्य केलं आहे, अशी प्रतिक्रिया राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी दिली आहे.
I feel bad. He should be given relief. He has done a lot of humanitarian work: Jaya Bachchan, Rajya Sabha MP on #SalmanKhan #BlackBuckPoachingCase pic.twitter.com/VUEM0RIweE
— ANI (@ANI) April 5, 2018
आसाराम बापूच्या शेजारीच सलमान खानला ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. लहान मुलींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप आसाराम बापूवर आहे.
ही शिक्षा सुनावल्यानंतर सलमान खाननं जोधपूरच्या सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर न्यायालय शुक्रवारी निर्णय देणार आहे. सलमानला शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर बिश्णोई समाजानं जल्लोष केला तर सलमानच्या समर्थकांनी नारेबाजी केली. यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून नागरिकांना तिकडून हटवलं.
खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावूक झाला होता.
सलमान खानला शिक्षा सुनावल्यानंतर सलमानची बहीण अलबिराला रडू आल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान खानच्या बहिणी त्यांच्या विषयी अधिक भावनिक आहेत. आज सलमानबरोबर बहिणी दिसल्या, पण भाऊ दिसत नव्हते, पण एकूणच सलमान खानला मोठा दिलासा आहे.
दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आज सकाळी न्यायालयात पोहोचल्यावर सलमान खानने न्यायालयरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभे राहून निर्दोष असल्याचे म्हटले. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान न्यायालयात पोहोचला होता.
१९९९ साली हम साथ साथ है चित्रपटाचं शूटिंग सुरु असताना काळविटाची शिकार करण्यात आली होती.
सलमान खान जोधपूर जेलमध्ये रवाना, पाहा आतमधले फोटो |