सलमान खानचा जामीन अर्ज दाखल, कधी होणार सुनावणी, पाहा...

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सलमान खानला अटक करून जोधपूर सेंट्रल तुरुंगात धाडण्यात आलं. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. यानंतर लगेचच सलमानच्या वतीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय. 

Updated: Apr 5, 2018, 06:46 PM IST
सलमान खानचा जामीन अर्ज दाखल, कधी होणार सुनावणी, पाहा...  title=

नवी दिल्ली : काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरच्या न्यायालयात गुरुवारी सलमान खानला दोषी करार देताना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर सलमान खानला अटक करून जोधपूर सेंट्रल तुरुंगात धाडण्यात आलं. त्याचवेळी त्याला १० हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. यानंतर लगेचच सलमानच्या वतीनं न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय. या जामीन अर्जावर शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.

सलमान खानला न्यायाधिशांनी शिक्षा सुनावल्यानंतर कोर्टात उपस्थित असलेल्या सलमानच्या दोन्ही बहिणी अर्पिता आणि अलवीरा यांना रडू कोसळलं. 

मुख्य न्यायाधीश देव कुमार खत्री यांनी सलमानच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. मिळालेल्या माहितीनुसार, तुरुंगात जाण्यापूर्वी सलमान खाननं आपले वडील सलीम खान यांच्याशी फोनवर बातचीत केली. सुरक्षेच्या कारणान्ं सलमानला तुरुंगातील वेगळ्या बरॅकमध्ये ठेवण्यात आलंय.

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता. काळवीट शिकार खटला निकालाच्यावेळी सलमानला दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल  करण्यात आला होता.

दरम्यान, सैफअली खान, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. या कलाकारांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आज सकाळी न्यायालयात पोहोचल्यावर सलमान खानने न्यायालयरूममध्ये न्यायाधीशांसमोर उभे राहून निर्दोष असल्याचे म्हटले. आरोपींपैकी सर्वात आधी सलमान खान न्यायालयात पोहोचला होता.