या सिनेमातून सलमान-प्रियंका तब्बल १० वर्षांनी एकत्र!

हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा रोवल्यानंतर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा भारतात परत येत आहे. 

Updated: Mar 20, 2018, 05:05 PM IST
या सिनेमातून सलमान-प्रियंका तब्बल १० वर्षांनी एकत्र! title=

मुंबई : हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा झेंडा रोवल्यानंतर बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा भारतात परत येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परतीनंतर प्रियंका-सलमानची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अली अब्बास जफर यांच्या भारत या सिनेमात प्रियंका सलमान खानसोबत झळकेल. 

याची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी रिपोर्टनुसार अली अब्बास यांनी न्युयॉर्कमध्ये प्रियंकाची भेट घेतली.

यापूर्वी २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या गॉड तुसी ग्रेट हो या सिनेमात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघं तब्बल १० वर्षांनी एकत्र झळकणार आहेत. लवकरच सोशल मीडियावर याची अधिकृत घोषणा करण्यात येईल.

सध्या सलमान रेस ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यानंतर सलमानकडे दबंग ३ आणि भारत हे दोन सिनेमे आहेत.