मुंबई : दुबईत बाथटबमध्ये बुडून भारताच्या पहिल्या महिला सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवींचा मृत्यू झाला.
वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवींनी घेतलेली अकाली एक्झिट रसिकांच्या मनाला चटका लावून गेली. श्रीदेवींच्या अकाली निधनाने कपूर कुटुंबीयांप्रमाणेच बॉलिवूडचेही नुकसान झाले आहे. मात्र शो मस्ट गो ऑन हा नियम असल्याने सरेच पुन्हा कामावर रूजू झाले आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री श्रीदेवी या 'शिद्दत' चित्रपटामध्ये काम करणार होत्या. त्यामध्ये संजय दत्त आणि माधूरी ही जोडी पुन्हा रूपेरी पडद्यावर दिसणार होती. मात्र श्रीदेवींच्या अकाली जाण्याने आता त्यांच्याऐवजी माधुरी या चित्रपटाचा भाग होणार आहेत असे काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते.
जान्हवी कपूरनं काही दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टमध्ये श्रीदेवी अभिषेक बर्मनच्या आगामी चित्रपटाबाबत खूपच उत्सुक होत्या. आता माधुरी दीक्षित या चित्रपटाचा भाग झाल्याने आम्ही त्यांच्या आभारी आहोत. अशा आशयाची पोस्ट शेअर केली. 'शिद्दत' चित्रपटामध्ये श्रीदेवींऐवजी झळकणार 'ही' अभिनेत्री, जान्हवी कपूरची खास पोस्ट
Some clarifications!!! Yes...we are honoured and humbled to have @MadhuriDixit on board for @abhivarman ‘s next! NO the film is NOT titled SHIDHAT! Yes the film will Commence shoot in mid April! The films final cast and credits will be announced soon!
— Karan Johar (@karanjohar) March 19, 2018
दिग्दर्शक करण जोहरने केलेल्या पोस्टमध्ये श्रीदेवींना माधुरी रिप्लेस करणार का ? या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. करण जोहरने केलेल्या ट्विटनुसार अभिषेकच्या आगामी चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित झळकणार हे खरं आहे पण तो चित्रपट 'शिद्दत' नाही असे त्याने स्पष्ट केलं आहे.
श्रीदेवींच्या निधनानंतर शिद्दत हा चित्रपट करण जोहर पुन्हा करणार नाही असेही काही मीडिया रीपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.