हा अभिनेता करणार 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक

कोण साकारणार राहुल्याची भूमिका 

हा अभिनेता करणार 'मुळशी पॅटर्न'चा हिंदी रिमेक  title=

मुंबई : मराठीतील दर्जेदार सिनेमे गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलिवूडला आकर्षित करत आहेत. मग तो 'सैराट' असो किंवा 'पोस्टर बॉईज'. आता सध्या बॉक्स ऑफिसवर गाजत असलेला 'मुळशी पॅटर्न' हा मराठी सिनेमा देखील बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. 

आपल्याला माहितच आहे प्रवीण तरडे लिखित आणि दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' हा सिनेमा बॉक्स ऑफिस असो वा सोशल मीडिया सगळीकडेच गाजत आहे. मुळशी पॅटर्न या सिनेमाची फार चर्चा झाली. आता बॉलिवूडमध्ये याचा रिमेक लवकरच येणार आहे. 

अभिनेता सलमान खान या सिनेमाचा रिमेक करणार आहे. सलमान खान या सिनेमाच्या प्रेमात पडला आहे. सलमान खान आपला मेहुणा आयुष शर्माला घेऊन हा सिनेमा तयार करणार आहे.

ओम भुतकरने साकारलेल्या राहुल या भूमिकेकरता आयुष शर्माची निवड करण्यात आली आहे. 2019 मध्ये या रिमेकला सुरूवात होणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला या सिनेमाच्या रिमेकसंदर्भात सलमाननं चर्चा केल्याचं वृत्त आहे.

काही दिवसांपूर्वीच मुळशी पॅटर्न हा सिनेमा सलमान खानचा भाऊ अरबाज खानने पाहिला. अरबाज खानने या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं. असा संदर्भ लावण्यात येत आहे की, अरबाज खाननेच सलमान खानकडे 'मुळशी पॅटर्न' सिनेमाचं भरभरून कौतुक केलं. आणि त्यानंतरच सलमान खानने हा एवढा मोठा निर्णय घेतला. 

आपल्याला माहित आहे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमाने 3 दिवसांत 5 करोड रुपयांच कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केलं आहे. आतापर्यंत या सिनेमाने 13 करोड रुपयांच्यावरचा आकडा गाठला आहे.  या सिनेमातील दिग्दर्शक प्रविण तरडे यांच आणि अभिनेता ओम भुतकरचं भरपूर कौतुक होत आहे.