सनी देओलनंतर बॉर्डर क्रॉस करत सलमान खान जाणार पाकिस्तानात? 'टायगर 3' चा प्लॉट लीक?

Salman Khan Tiger 3 : सलमान खानच्या 'टायगर 3' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, त्यात 'टायगर 3' विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 15, 2023, 04:55 PM IST
सनी देओलनंतर बॉर्डर क्रॉस करत सलमान खान जाणार पाकिस्तानात? 'टायगर 3' चा प्लॉट लीक?  title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan Tiger 3 : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘टाइगर 3’ या चित्रपटाला घेऊन चर्चेत आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी दिवाळीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असे म्हटले जाते. या चित्रपटात सलमान खान पुन्हा एकदा एका एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रेक्षकांना सलमानच्या या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहेत. त्याचं कारण या चित्रपटाच्या फ्रॅंन्चायझी मधील आधीचे दोन चित्रपट आहे. त्यातही सलमानचा नुकताच प्रदर्शित झालेला किसी का भाई किसी की जान हा चित्रपट फ्लॉप ठरला. प्रेक्षकांच्या पसंतीस हा चित्रपट उतरला नाही. त्यामुळे आता सलमानच्या चाहत्यांना त्याच्या ‘टाइगर 3’ या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘टाइगर 3’ या चित्रपटात सलमान खान एका गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर तो पाकिस्तानला जाणार. माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तानमध्ये खूप मोठा वाद निर्माण होतो असे दाखवण्यात येणार आहे. निर्माते या चित्रपटाच्या तयारीत लागले आहे. तर इमरान हाश्मीला आयएसआयच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात सलमान खान बॉर्डर क्रॉस करत पाकिस्तानात जाईल आणि त्याच्या शत्रुंसोबत लढताना दिसतो. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

'टायगर 3' या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे. तर त्याच्या या चित्रपटात कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत देखील दिसणार आहे. तर अभिनेता इमरान हाश्मी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुख खान या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'टाइगर 3' हा चित्रपट यंदाच्या वर्षी दिवाळीत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, सलमान ‘टाइगर 3’ ला घेऊन खूप व्यस्त आहे. तर हे दोनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरले होते. आता प्रेक्षकांना आतुरता आहे की सलमान खान या चित्रपटात काय नवीन करणार आहे. 

हेही वाचा : तुरुंगातील त्या दिवसांची आठवण करत सलमान खान म्हणाला, 'बाथरुम साफ करण्यापासून...'

सलमानविषयी बोलायचे झाले तर सध्या तो आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे आणि ते म्हणजे सलमान एका रिअॅलिटी शोचं सुत्रसंचालन करत असून त्यावेळी त्यानं तुरुंगात आणि बोर्डिंग स्कूलमध्ये असताना त्यानं बाथरुम साफ केल्याचा खुलासा केला होता. सलमान खाननं सांगितलं की तिथे कोणतंच काम हे छोटं किंवा मोठं नसतं.