तुरुंगातील त्या दिवसांची आठवण करत सलमान खान म्हणाला, 'बाथरुम साफ करण्यापासून...'

Salman Khan on Cleaning Toilets in Jail : सलमान खान सध्या एका रिअॅलिटी शोचं सुत्रसंचालन करत आहे. सलमान खाननं यावेळी त्याच्या तुरुंगातील दिवसांविषयी देखील सांगितलं आहे. तो तिथे बाथरुम साफ करायचा याचा खुलासा त्यानं केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 15, 2023, 04:09 PM IST
तुरुंगातील त्या दिवसांची आठवण करत सलमान खान म्हणाला, 'बाथरुम साफ करण्यापासून...' title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan on Cleaning Toilets in Jail : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. कधी त्याचे वादग्रस्त वक्तव्य, तर कधी त्याच्या रिलेशनशिप्स आणि खासगी आयुष्य... सध्या सलमान खान एका रिअॅलिटी शोचं सुत्रसंचालन करताना दिसत आहे. यावेळी सलमान खाननं रिअॅलिटी शोमध्ये असलेल्या स्पर्धकांचे बाथरुम साफ ठेवण्यावरून सगळ्यांची स्तुती केली आहे. त्यासोबत त्यानं त्याचे तुरुंगातील दिवसांविषयी सांगताना तो स्वत: त्याचं बाथरुम साफ करायचा याचा खुलासा केला आहे. 

या सगळ्याची सुरुवात सलमाननं त्या रिअॅलिटी शोमध्ये कधीच इतकं साफ बाथरुम पाहिलं नव्हतं. बाथरुमला साफ ठेवण्यासाठी सलमाननं पूजा भट्टची स्तुती केली. त्यानंतर सलमान म्हणाला, जेव्हा मी बोर्डिंग स्कूलमध्ये होतो, तेव्हा मी स्वत: बाथरुम साफ केले आहेत, इतकंच नाही तर तुरुंगातही. मला माझी कामं स्वत: करण्याची सवय आहे. कोणतही काम छोटं किंवा मोठं नसतं. कोणाच्या लक्षात नसेल तर सलमान खानला जोधपूर कोर्टानं काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याशिवाय, या शोच्या ग्रॅंड फिनालेमध्ये अभिनेता आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे त्यांचया आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. ते दोघे लवकरच 'ड्रीम गर्ल 2' मध्ये दिसणार आहेत. यावेळी कृष्णा अभिषेकनं सलमानला प्रश्न विचारला की 'तू यशस्वी होण्यासाठी किती महिलांना तू श्रेय देशील?' सलमान काही उत्तर देईल त्याआधीच आयुष्मान खुराना म्हणाला 'किती ड्रीम गर्ल्स? यावर उत्तर देत सलमान म्हणतो चार महिला आहेत. दोन माझ्या आई आणि दोन बहीणी आहेत.' 

हेही वाचा : Gadar 3 कधी येणार? सनी देओलनं दिलेलं उत्तर ऐकून चाहत्यांची उत्सुकता वाढली

सलमान खानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'टायगर 3' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 'टायगर' या फ्रॅंचायझीचा तिसरा भाग असून यशराज स्पाय फ्रेन्चायझीचा लोकप्रिय असलेल्या चित्रपट आहे. या चित्रपटात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान त्याच्या 'पठाण' या भूमिकेतून चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या रुपात दिसणार आहे. त्या दोघांना पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.