मुंबई : आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात अभिनेता सलमान खानचं नाव आहे. त्याच्या चित्रपटांमुळे, स्वभावामुळे आणि रागामुळे तो कायम चर्तेत असतो. शिवाय बॉलिवूडचा गॉडफादर म्हणून देखील त्याची ओळख आहे. अशा सलमानसाठी मैत्रीची व्याख्या काहीशी वेगळी आणि मनाला पटणारी आहे. सलमान अनेक वर्षांपासून कलाविश्वात काम करत आहे. त्याच्या या प्रवासात त्याला अनेक लोकं भेटली. काहींनी त्याच्या मनात घर केल, तर काही मात्र त्याला सोडून गेली.
कलाविश्वात तो जास्त त्याच्या मैत्रीसाठी ओळखला जातो. सलमानला मैत्री करण्यासाठी वेळ लागतो. आज त्याच्या आयुष्यात जी मित्रमंडळी आहेत ती २०- ३० वर्ष जुनी आहेत. तर जीवनाच्या प्रत्येक वळणावर मैत्री होत असते. पण आपल्या माणसांची जागा कोणीही घेवू शकत नाही. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सलमानने मैत्रीबद्दल भाष्य केलं.
तो म्हणाला, 'सुरवातीला जीवनात येणारा प्रत्येक व्यक्ती चांगला वाटतो. वेळ जातो तसा एकमेकांच्या उणीवा दिसू लागतात. जर तुम्हाला त्या व्यक्तीच्या सर्व उणीवा मान्य असतील तर काही हरकत नाही. पण जर त्या उणीवा स्वीकारण्याची शक्ती आपल्यात नसेल तर अशी मैत्री फार काळ टिकणं अशक्य असल्याचं तो म्हणाला.
शिवाय, कालांतराने अशा नात्याचं, मैत्रीचं आपल्याला ओझं वाटतं. त्यानंतर नाती तुटतात. अशा तुटलेल्या नात्यांचा सुरवातीला खुप त्रास होतो. त्या व्यक्ती तुमच्या नजरेपासून दूर होतात. कालांतराने मनातूनही दूर होतात. असं मत सलमानने व्यक्त केलं.