सलमान खान हातात निळ्या रंगाचं ब्रेसलेट का घालतो? धक्कादायक रहस्य उघड!

अलीकडेच सलमान खानने त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. 

Updated: Jan 3, 2022, 03:30 PM IST
सलमान खान हातात निळ्या रंगाचं ब्रेसलेट का घालतो? धक्कादायक रहस्य उघड! title=

मुंबई : अलीकडेच सलमान खानने त्याचा 56 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनपेक्षा सलमान खान साप चावल्यामुळेच चर्चेत आला होता. आज आम्ही तुम्हाला सलमान खानच्या एका जुन्या व्हिडिओबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये त्याने सांगितलं होतं की, त्याला वाईट नजर लागण्यापासून आणि नकारात्मकतेपासून कोण वाचवतं. हे दुसरं तिसरं काही नाही तर सलमान खानचं ब्रेसलेट आहे जे अभिनेता नेहमी त्याच्या हातात घालतो. या जुन्या व्हिडिओमध्ये सलमान स्वतः या ब्रेसलेटबद्दल सांगत आहे.

हा व्हिडिओ एका इव्हेंट दरम्यानचा आहे. ज्यामध्ये सलमान खानचा एक चाहता अभिनेत्याला या ब्रेसलेटबद्दल विचारत आहे. यावर सलमान म्हणतो की, तो लहान असताना त्याचे वडील सलीम खानही असंच ब्रेसलेट घालायचे. सलमानच्या म्हणण्यानुसार त्याला हे ब्रेस्लेट खूपच आवडलं होतं. सलमान पुढे म्हणाला की, जेव्हा तो स्वतः अभिनय क्षेत्रात आला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला नेमकं हेच ब्रेसलेट भेट दिलं. ब्रेसलेटमध्ये असलेल्या दगडाचं नाव फिरोजा असल्याचे अभिनेत्याने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानने त्याच्या चाहत्याला सांगितलं की, हा दगड स्वतःवर येणारी सगळी नकारात्मकता सहन करतो. अभिनेत्याच्या मते, जेव्हा नकारात्मकता जवळ येते तेव्हा हा दगड स्वतःच तुटतो. सलमान खान व्हिडिओमध्ये सांगितलं की, हा त्याचा 7 वा दगड आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सलमान खानचा 'टायगर 3' या वर्षी रिलीज होणार आहे. त्याचबरोबर शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटात सलमानही छोट्या भूमिकेत दिसणार आहे.