सलमान खानची भाची बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज; दिसणार या सिनेमात

अलिजेह अग्निहोत्री ही सलमानची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.  

Updated: Nov 22, 2022, 10:03 PM IST
सलमान खानची भाची बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज; दिसणार या सिनेमात title=

Filmmaker Soumendra Padhi : बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींची चर्चा तर कायम रंगलेली असते. पण स्टार किड्स म्हटलं तर अनेकांना त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असते. सध्या एका सुंदर मुलीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ही सुंदर मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता सलमान खानची भाची आहे. सलमानच्या भाचीचं नाव अलिजेह अग्निहोत्री असं आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. एवढंच नव्हेतर अभिनेत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जातंय.

अलिजेह अग्निहोत्री ही सलमानची बहीण अलवीरा खान अग्निहोत्री आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे.   अलिजेह अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.   जिथे सलमान खान आजही आपल्या चित्रपटातून लोकांचं मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर त्यांची पुढची पिढीही चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सज्ज आहे.  

सलमानच्या भाचीचं सिनेसृष्टीत पदार्पण
सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीझेह जवळपास दोन वर्षांपासून अभिनय आणि नृत्य शिकत आहे. आता तिच्या डेब्यू चित्रपटाबद्दल जाणून घेतल्यावर असं दिसतं की, तिचे पालक आणि सलमान खानच्या मते, अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी तयार आहे.

अभिनेत्रीने तिच्या पहिल्या चित्रपटाचं शूटिंग सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. सलमान खानच्या भाचीचा हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. आता पाहण्यासारखं आहे की, अलिझेह अग्निहोत्री मोठ्या पडद्यावर तिची जादू चालवणार का. तिच्या स्क्रिप्टची निवड चांगली असल्याचं बोललं जात असलं तरी. या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला लवकरच मिळतील.

सौमेंद्र पाधी यांच्यासोबत काम करण्याची संधी
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सौमेंद्र पाधी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची स्क्रिप्ट लीगच्या बाहेर असल्याचं सांगितलं जात आहे. सौमेंद्र वेब सीरीज जमतारा आणि बुधिया सिंग: बॉर्न टू रन या चित्रपटासाठी ओळखले जातात. प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी सलमान खानच्या भाचीला डान्सचं ट्रेनिंग दिलं आहे.