मुंबई : अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा या महिन्यात 'टायगर जिंदा है' हा सिनेमा रिलीज होणार आहे, या आधी सलमान आणि कतरिना यांनी एक फोटोशूट केलं आहे.
प्रेक्षकांसाठी हे फोटोशूट एक पर्वणीच म्हणावी लागेल, कारण सलमान आणि कतरिना हे बऱ्याच दिवसापासून मोठ्या पडद्यावर झळकलेले नाहीत. 'टायगर जिंदा है'च्या माध्यमातून सलमान-कतरिना झळकतीलही, पण त्या आधी ते फोटोशूटमध्ये झळकणार आहेत.
सलमान खानची जादू काहीशी ओसरलीय, की काय?, असा प्रश्न पडत असताना सलमान 'टायगर जिंदा है' मधून आपल्या चाहत्यांमध्ये, आपलं चैतन्य निर्माण करण्यासाठी फोटो शूट करतोय की काय असा देखील प्रश्न पडतोय.
सलमान आणि कतरिनाचं हे फोटोशूट जरा हटके आहे. दोघांची केमिस्ट्री जुळत असल्याचंही यावरून दिसून येतं, टायगर जिंदा है यात सलमान-कतरिनाची केमेस्ट्री कशी जुळून येईल, हे प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतरच कळणार आहे.
टायगर जिंदा है हा सिनेमा २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे. तसेच २०१२ नंतर पहिल्यांदा सलमान-कतरिना एकाच चित्रपटात झळकणार आहेत.