मुंबई : तुरुंगातून सुटलेला सलमान खान जोधपूरहून मुंबई विमान तळावर दाखल झालाय. सलमान परतणार म्हणून मुंबईतल्या त्याच्या 'गॅलक्सी' या राहत्या घरासमोर चाहत्यांनी एकच गर्दी केलीय. एका विशेष विमानानं सलमान मुंबईत पोहचला. घरी दाखल झाल्यानंतर घरासमोर जमलेल्या आपल्या चाहत्यांना हात दाखवत सलमाननं त्यांचे आभार मानले... हातानंच 'आपल्याला आता झोप आलीय' असा इशारा करत चाहत्यांना आपल्या घरी परतण्याची विनंतीही त्यानं यावेळी केली.
यावेळी, सलमानसोबत त्याचे वडील सलीम खान, आई सलमा खान, बहिण अर्पिताचा मुलगा अहिल तसंच बॉडिगार्ड शेरा हेदेखील उपस्थित होते.
दरम्यान, सलमानच्या चाहत्यांनी आतषबाजी करत एखाद्या हिरोसारखं त्याचं स्वागत केलंय. सलमानच्या घरासमोर त्याचे अनेक चाहते हुल्लडबाजी करतानाही दिसले.
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानची जामीन मिळाल्यानंतर जेलमधून सुटका झाली. सलमान खानची जेलमधून सुटका झाल्यानंतर सलमान खानच्या गाडीमागे फॅन्सची गर्दी धावत गेली. सलमान खान चार्टड विमानाने जोधपूरहून मुंबईत येणार आहे. सलमान खानला परवनागीशिवाय परदेशात जाता येणार नाहीय. सलमान खानची सुटका झाल्यानंतर जेलबाहेर त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
१९९८ मध्ये केलेल्या काळवीट शिकारप्रकरणी सलमानला ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसातच सलमानच्या जामीन अर्जाला मंजुरी देण्यात आली. या बातमीमुळे सलमानचा परिवार, फॅन्स आणि शुभचिंतकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सलमानला जामीन मिळाल्याच्या बातमीनंतर जोधपुर कोर्टाबाहेर फटाक्यांचा आवाज घुमू लागला. सलमानच्या नावाच्या घोषणांना परिसर दणाणून गेला. तसेच फॅन्सनी कोर्टाबाहेर लाडू आणि पेढे वाटून निर्णयाच स्वागत करत आनंद व्यक्त केला. मुंबईतही असाच उत्साह पाहायला मिळाला. वांद्रेयेथील त्याच्या राहत्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर चाहत्यांनी गर्दी करायला सुरूवात केली. गाजावाजा करुन सलमानच्या मुंबईत येण्याची वाट पाहत आहेत.
सलमानला जामीन दिल्याच्या निर्णयानंतर बिश्नोई समाजात दु:खाचे वातावरण पसरले. २० वर्षे चाललेल्या या केसमध्ये मोठा विजय प्राप्त झाला होता. आता सलमानची जामीनावर सुटका झाल्याने बिश्नोई समाजाचा हिरमोड झालाय. कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर सलमानला आज सायंकाळपर्यंत सोडल जाऊ शकेल.