पहिल्यांदाचं सलमान खान याच्याकडून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

अरबाझच्या शोमध्ये सलमानने दिलं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर 

Updated: Jul 15, 2021, 02:42 PM IST
पहिल्यांदाचं सलमान खान याच्याकडून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर  title=

मुंबई : अभिनेता आणि निर्माता अरबाझ खान (arbaaz khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसचं आहे, अभिनेत्याचा सेलेब्रिटी चॅट शो पिंच (Pinch)चा दुसरा भाग लवकरचं चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पिंच (Pinch) शो टेलिकास्ट होण्यापूर्वी अरबाजने शोची एक झलक चाहत्यांसाठी प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये अभिनेता  सलमान खानचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अरबाज खानने त्याच्या या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत सोशल मीडिया संबंधित गप्पा मारल्या आहेत. शोमध्ये स्टार्ससमोर त्यांच्या कमेन्ट्सबद्दल चर्चा झाली. अरबाझने शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये सर्वप्रथम अरबाझ सलमानसमोर कमेन्ट वाचताना दिसतो.  जनतेचा देव बणण्याचा प्रयत्न करू नका... अशी एक कमेन्ट अरबाज बाचतो. 

अशी कमेन्ट ऐकून सलमान म्हणतो, 'अगदी बरोबर देव एकचं आहे आणि मी देव नाही.' प्रोमोमध्ये कमेन्टला उत्तर देत सलमान म्हणाला, 'माझ्या पोस्टमध्ये त्यांनी असं काय पाहिलं की त्यांना माझं घर अय्याशीचा अड्डा वाटू लागला आहे...' प्रोमोमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार एकत्र दिसले, अनिल कपूर, फराह, राजकुमार, आयुष्मान खुराना, अनन्या पांडे देखील ट्रोलर्सच्या कमेन्टवर उत्तर देताना दिसले.