शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्...

Salman Khan and Shilpa Shetty date : सलमान खानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. पण एक दिवस सलमान शिल्पा शेट्टीसोबत डेटवर जाणार होता. त्यावेळी त्यांचा प्लॅन हा तिच्या वडिलांमुळे स्पॉइल झाला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 15, 2023, 06:35 PM IST
शिल्पा शेट्टीला डेटवर घेऊन जाण्यासाठी निघालेला Salman Khan, वडिलांशी बोलायला गेला अन्... title=
(Photo Credit : Social Media)

Salman and Shilpa Shetty date : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचं (Salman Khan) नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. मात्र, सलमाननं कधी लग्न केलं नाही. आजही त्याच्याशी लग्न करण्यासाठी हजोरोच्या संख्येन मुली तयार आहेत. त्याच्या चाहत्या आजही तो कधी लग्न करणार असा प्रश्न विचारत असतात. करियरचा सुरुवातीपासून सलमानचे नाव अनेक अभिनेत्रीशी जोडले गेले. मग ती सोमी अली असो संगीता बिजलानी, ऐश्वर्यापासून ते कतरीना पर्यंत. सलमानचा सगळ्याच गर्लफ्रेंड मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरल्या होत्या. पण तुम्हाला माहीत आहे का की, सलमानन एके काळी शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) जवळ जाण्याच प्रयत्न करत होता, पण तिच्या वडिलांनी त्याचा हा प्लॅन फेल केला.

सलमान खान आणि शिल्पा शेट्टी हे एकेकाळचे बॉलिवूडचे सुपरस्टार एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. एकदा खुद्द सलमान खानने फराह खान समोर या गोष्टीचा खुलासा केला होता की , तो शिल्पाला डिनर डेटवर घेऊन जायला निघाला होता, परंतु शिल्पाचा वडिलांनी सलमानला बाल्कनीतूनच असे सुनावले की त्याचे मन दुखावले. सलमानच्या 'दस का दम' शोच्या तिसऱ्या पर्वात शिल्पा आणि फराहनं हजेरी लावली होती. त्यावेळी सलमानने शिल्पाला डिनर डेटवर घेऊन जाण्याचा किस्सा सर्वांसमोर सांगितला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमान म्हणाला तो किस्सा सांगत म्हणाला, आम्ही एकत्र शूट करत होतो, मग एक दिवस आम्ही एकत्र डिनरचा प्लॅन बनवला. त्यावेळी शिल्पा चेंबूरला राहत होती, म्हणून मी शिल्पाला तिच्या घरून घेण्यासाठी चेंबूरला गेलो. ती तिसर्‍या मजल्यावर राहायची, मी शिल्पाला आवाज देण्यासाठीवर पहिले तर शिल्पा ही खालीच येत होती. तेव्हा सलमाननं पाहिले की बाल्कनीमध्ये हातात दारूचा ग्लास आणि लुंगी घातलेली व्यक्ती त्याच्याकडे बघत होती. 

शिल्पा खाली आल्यावर सलमानने  विचारले हे कोण आहे? तेव्हा शिल्पाने सांगितले की ते तिचे वडील आहेत. हे ऐकून सलमान घाबरला. सलमान नमस्कार करत तिच्या वडिलांना विचारले की कसे आहात. तर त्यावर उत्तर देत ठीक आहे असं म्हणाले. शिल्पाचे वडील ज्या प्रकारे त्याला पाहत होते त्यानं सलमान घाबरला. तेव्हा ते ओरडून म्हणाले, 'तू तिला 12 वाजेपर्यंत परत आण'. त्यावर उत्तर देत आता साडेअकरा वाजले असं सलमाननं सांगितलं. त्यानंतर त्यांनी सलमानला वर बोलावले त्यानंतर तिचे वडील त्याच्याशी बोलू लागले. शिल्पा 15 मिनिटं खाली थांबली आणि मग झोपायला गेली. तर सलमान सकाळी 5:30 वाजता घरी जायला निघाला. तितका वेळ सलमान शिल्पाच्या वडिलांशी गप्पा मारत होता. 

हेही वाचा : '10 महिन्याचं बाळ असलेल्या एका महिलेची बॅग घेतली आणि...', अभिनेता Ajith Kumar चं कौतुक

सलमाननं सांगितलेला हा किस्सा ऐकल्यानंतर शिल्पा आणि फराह जोरात हसू लागले. सलमान आणि शिल्पानं अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या दोघांचा 'औजार', 'शादी करके फास गया यार', 'गर्व: प्राइड एंड ऑनर' आणि 'फिर मिलेंगे' सारखे चित्रपट चांगले गाजले होते.