OMG ! हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने अक्षयच्या 'टॉयलेट' बद्दल केले असे ट्वीट

 बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला ‘टॉयलेटः एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सलमाने ट्वीट करुन अक्षयला शुभेच्छा दिल्या असून उघड्यावर शौच करण्यावरूनही तिने काही गोष्टी सांगितल्या आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 13, 2017, 12:57 PM IST
 OMG ! हॉलीवूडच्या या अभिनेत्रीने अक्षयच्या  'टॉयलेट' बद्दल केले असे ट्वीट title=

 नवी दिल्ली :  बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला ‘टॉयलेटः एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सलमाने ट्वीट करुन अक्षयला शुभेच्छा दिल्या असून उघड्यावर शौच करण्यावरूनही तिने काही गोष्टी सांगितल्या आहेत.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सलमा हायेक आपल्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. ‘फ्रीडा’ चित्रपटातील अभिनयाने तिने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात खास ओळख निर्माण केली आहे. अशा जगप्रसिद्ध सलमा हायेकने अक्षकुमारच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'टॉयलेट एक प्रेम कथा' सिनेमाबद्दल एक ट्वीट केले आहे. या ट्वीटवरुन सोशल मीडियात चांगली चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.
अभिनेत्री सलमा हायेक नेहमीच महिलांच्या समस्यांविरुद्ध आवाज उठवताना पाहिले आहे.सामाजिक जाणीव असेली सुंदर अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिने ‘वन्स अपॉन अ टाइम मेक्सिको’ आणि ‘आफ्टर द सनसेट’ यांसारख्या चित्रपटांतही काम केले आहे. 

सलमाने ट्वीट मध्ये म्हटले आहे की, ‘आज रिलीज होणाऱ्या ‘टॉयलेटः एक प्रेम कथा’ या चित्रपटासाठी अक्षय कुमारला शुभेच्छा! उघड्यावर शौचास बसण्याची पद्धत आता बंद होईल आणि कोणत्याही महिलेला शौचास जाण्यास भीती वाटणार नाही.’‘टॉयलेटः एक प्रेम कथा’ प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे. सलमाच्या ट्वीटनंतर अक्षयच्या चाहत्यांनी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.