सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर बिल्डरवर गुन्हा दाखल

ज्येष्ठ अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवल्यानंतर बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Updated: Jan 10, 2018, 08:45 AM IST
सायरा बानो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर बिल्डरवर गुन्हा दाखल  title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री आणि ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार नोंदवल्यानंतर बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

सायरा बानो यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, बिल्डर आपली २५० करोड रुपयांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार ट्विटरवरून केली होती. या प्रकरणी त्यांनी गेल्या आठवड्यात या प्रकरणाची पोलिसांत रितसर तक्रारही नोंदवली होती.

पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (ईओडब्ल्यू) तत्काळ या प्रकरणाची दखल घेत बिल्डर समीर भोजवानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी बिल्डरच्या ऑफिस आणि घरावर छापेही टाकले.

पाली हिलमधील जागेचा वाद

- १९५३ ला दिलीप कुमार यांनी हसन लतीफ यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपये देऊन जागा खरेदी केली होती

- २००८ ला जागेचा पुनर्विकास करण्यासाठी परजिता डेव्हलपर्स सोबत करार केला

- पण ३० ऑगेस्ट २०१७ मध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला कि  हि जागा डेव्हलपर्सनी दिलीप कुमार यांना पुन्हा परत द्यावी

- १२ सप्टेंबर २०१७ ला सायरा बानो यांनी जागेचा ताबा घेतला

- पण वांद्रे पाली हिल मधील बिल्डर समीर भोजवानी यांनी खोटी कागदपत्रे तयार करून सदर जागा आपली असल्याचा दावा केल्याचा आरोप सायरा बानो यांनी केला.

- हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहचलं आणि ११ वर्षांच्या सुनावणीनंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात न्यायालयानं दिलीप आणि सायरा यांच्या बाजुनं निर्णय दिला.

 

- आणि आता जागा बळकवण्यासाठी भोजवनी यांचे प्रयत्न होत असल्याचा आरोप सायरा बानो यांचा आहे. भोजवनी यांच्याकडून धमक्या येत असल्याचाही बानो यांचा आरोप आहे. तशी लेखी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

- राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांचा गैरवापर करून बिल्डर दबाव आणत असल्याचं सायरा बानो यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं होतं.  

- मुंबई पोलीस दलाचा आर्थिक गुन्हे तपास विभाग प्रकरणी पुढील कार्यवाही करीत आहेत