'पद्मावत'च्या 300 कट्सवर सेन्सॉर बोर्डाची माहिती

दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या बहुप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.

Updated: Jan 10, 2018, 08:16 AM IST
'पद्मावत'च्या 300 कट्सवर सेन्सॉर बोर्डाची माहिती   title=

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांच्या बहुप्रतिक्षित 'पद्मावती' या चित्रपटाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे.

चित्रपटाच्या नावामध्ये तसेच सिनेमात काही बदल करून हा चित्रपट रसिकांसमोर येणार असल्यची माहिती देण्यात आली आहे. 

25 जानेवारीला रिलीज  

दीपिका पादुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंग यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'पद्मावत' या नावाने 25 जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे.  

5 बदल

'पद्मावत' या चित्रपटामध्ये सेंसॉर बोर्डाने पाच कट्स सुचवले होते. परंतू चित्रपटामध्ये 5 बदल केल्यास त्यामध्ये 300 हून अधिक कट्स लागण्याची शक्यता होती. त्यामुळे चित्रपटामध्ये मोठे बदल होणार होते. मात्र सेन्सॉर बोर्डाचे प्रमुख प्रसुन जोशी यांनी या वृत्ताला फेटाळले आहे. त्यामुळे चित्रपटामध्ये 300 कट्स ऐवजी महत्त्वाचे बदल करून तो रिलीज केला जाईल अशी माहिती मिळत आहे.  

'पद्मावत'ला विरोध कायम  

चित्रपटाच्या नावामध्ये बदल करून तसेच काल्पनिक पात्रांमध्ये या चित्रपटाच्या कहाणीला सांगण्यात येईल अशी माहिती दिली जात आहे. मात्र तरीही या चित्रपटाला करणी सेनेचा विरोध कायम आहे. चित्रपट रिलीज झाल्यास देशभर आंदोलन केलं जाईल अशा स्वरूपाचा इशारा करणी सेनेने दिला आहे.  

पॅडमॅन सोबत टक्कर  

संजय लीला भंसाळींच्या 'पद्मावत' या चित्रपटाला 'पॅडमॅन'चं आव्हान असणार आहे. 25 जानेवारीला हे दोन्ही चित्रपट रिलीज होणार आहेत. त्यामुळे लॉन्ग विकेंड्सचा फायदा घेत कोणता चित्रपट बॉक्सऑफिस धुमाकूळ घालणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.