सैफ-तब्बू स्टारर 'जवानी जानेमन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

पाहा 'जवानी जानेमन'चा हटके ट्रेलर

Updated: Jan 10, 2020, 06:39 PM IST
सैफ-तब्बू स्टारर 'जवानी जानेमन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित title=
संग्रहित फोटो

मुंबई : सैफ अली खान (Saif Ali Khan), तब्बू (Tabu) आणि आलिया फर्निचरवाला (Alaia F) स्टारर 'जवानी जानेमन'  (Jawaani Jaaneman) चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नितिन कक्कड दिग्दर्शित 'जवानी जानेमन'मध्ये सैफचा फ्लर्टी अंदाज पाहायला मिळतोय. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो दिसतोय. 

आलिया फर्निचरवाला पूजा बेदी यांची मुलगी असून 'जवानी जानेमन'मधून आलियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. आलियाच या चित्रपटाचा सेन्टर पाईंट असल्याचं दाखवण्यात आलं आहे. 

ट्रेलरमध्ये सैफची भूमिका पार्टी करणारा, फ्लर्ट करणारा अशी दाखवण्यात आली आहे. सैफच्या मस्तीभऱ्या आयुष्यात अचानक एक टर्निंग पॉईंट येतो, ज्यावेळी त्याला समजतं आलिया त्याची मुलगी आहे. पण सैफ आलियाची जबाबदारी घेण्यास तयार नसतो. तब्बूने आलियाच्या आईची भूमिका साकारली आहे.

'तानाजी...'मधील भूमिकेनंतर सैफचा मस्ती-फ्लर्टी अंदाज चाहत्यांसाठी ट्रीट ठरु शकतो. फॅशनेबल, पार्टी आणि फ्लर्टी महिलेची भूमिका साकारणारी तब्बूही प्रभावी वाटत आहे. तर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर आलियाचा अभिनय पाहणंही मजेशीर ठरणार आहे.

आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या 'जवानी जानेमन'च्या पोस्टर्स आणि गाण्यांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय. 'जवानी जानेमन'चं नितिन कक्कड यांनी दिग्दर्शन केलं आहे. तर जॅकी भगनानीने चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या ३१ जानेवारी २०२०ला 'जवानी जानेमन' चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.