Amrita Singh on Kareena Kapoor and Sara Ali Khan Bonding: अभिनेत्री सारा अली खान आपल्या आईसोबत म्हणजे अमृता सिंगसोबत राहते. परंतु सैफ अली खान आणि करिना कपूरचं लग्न झाल्यापासून सारा अली खान आपल्या सावत्र आईसोबत म्हणजे करिना कपूरसोबतही चांगला वेळ घालवता दिसते. अनेकदा त्या तिघी एकत्र स्पॉट होताना दिसतात. (saif ali khan ex wife says she dont have any problem seeing the bonding of her daugther with step mother kareena kapoor)
करिना आणि सैफच्या लग्नात मुलगा इब्राहम आणि सारा दोघंही नटून थटून हजर होते. त्याचसोबत करिनाच्या दोन्ही मुलांसोबतही अब्राहम आणि सारा याचे चांगलेच नाते आहे. परंतु अमृता सिंग आणि करिना फारश्या एकत्र दिसत नाहीत. आपल्या मुलांचे करिनाशी असलेलं बॉन्डिंग अमृता सिंगला खुपतो का असला प्रश्न विचारला असता अमृताचं वक्तव्य खूप चर्चेत आहेत.
त्यामुळे करिना आणि साराच्या मैत्रीचा अमृता सिंगला त्रास होतो का यावर अमृता म्हणाली की, त्यांच्या बॉन्डिंगचा मला काहीच त्रास होतं नाही. उलट सैफ आणि करिनाच्या लग्नात अमृतानं स्वतःहूनच साराला तयार केले होते. तिच्यासाठी डिझायनर ड्रेसही बनवला होता.
सैफ अली खानची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असते. त्यांचे पहिले लग्न अमृता सिंगसोबत झाले होते. दोघांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली आणि लवकरच दोघे प्रेमात पडले. यानंतर दोघांनीही घरच्यांना न सांगता लग्न केले. ते सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांचे पालक झाले.
लग्नाच्या 13 वर्षानंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. दोघांचा परस्पर संमतीने घटस्फोट झाला आणि त्यांचे मार्ग एकमेकांपासून कायमचे वेगळे झाले. अमृता सिंगने दुसरं लग्न केलं नाही आणि आपल्या मुलांच्या संगोपनात ती व्यस्त झाली. दुसरीकडे, सैफ टशन चित्रपटाच्या सेटवर करीना कपूरच्या जवळ आला. दोघांमध्ये जवळीक वाढली आणि अखेर 2012 मध्ये त्यांनी लग्न केले.