सैफ अली खान होणार शेफ

अभिनेता सैफ अली खानचा शेफ नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, सैफच्या सर्व सिनेमांपेक्षा या सिनेमाचा विषय वेगळा आहे.

Updated: Sep 8, 2017, 02:29 PM IST

मुंबई : अभिनेता सैफ अली खानचा शेफ नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, सैफच्या सर्व सिनेमांपेक्षा या सिनेमाचा विषय वेगळा आहे. सैफची आपल्या मुलासोबतची मैत्री आणि त्याला कधीही दुरावा वाटणार नाही, असा त्याचा प्रयत्न पाहण्यासारखा आहे, त्यासोबतच सैफची आवड निवड आणि वेगळी प्रेम कहाणीही आहे.तर या सिनेमात तुम्हाला नक्की पाहता येईल सैफ अली खान कसा शेफ आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजा कृष्ण मेनन यांनी केलं आहे, शेफ हा सिनेमा ६ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे.