घटस्फोट घेतला तरी मुलगी समायरावर का होणार नाही परिणाम

हिंदी मालिकांमधील लोकप्रिय कलाकार जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांच्यातील घटस्फोट सर्वांनाच धक्कादायक आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 3, 2018, 08:05 PM IST
घटस्फोट घेतला तरी मुलगी समायरावर का होणार नाही परिणाम  title=

मुंबई : हिंदी मालिकांमधील लोकप्रिय कलाकार जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांच्यातील घटस्फोट सर्वांनाच धक्कादायक आहे. 

आठ वर्षांचं हे अतूट नातं आता संपुष्टात येणार आहे.  लहान मुलगी असताना जुही आणि सचिन घटस्फोट घेत असल्यामुळे सर्वच स्तरावरून त्यावर चर्चा होत होती. मात्र या घटस्फोटाबाबत पहिल्यांदा जुही परमार हिने आपली बाजू समोर आणली आहे. जुहीने म्हटलंय की, आमची मुलगी समायरासाठी घटस्फोट हा धक्कादायक नसणार आहे. कारण तिच्या बाबाची गैरहजेरी तिला त्रास देणार नाही. कारण तिला त्याची सवय आहे. तिने घरी खूप कमी वेळा तिच्या बाबाला पाहिलं आहे. 

गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये वितुष्ट आल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे. 2009 मध्ये जुही आणि सचिन विवाहबंधनात अडकले होते. त्यांना समायरा नावाची चार वर्षांची मुलगी आहे. मुलीच्या जन्मामुळे जुहीने ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्या वर्षी 'कर्मफल दाता शनि' या मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेतून कमबॅक केलं.

2002 मध्ये स्टार प्लसवर असलेल्या 'कुमकुम- एक प्यारासा बंधन' मालिकेतून जुही प्रसिद्धीच्या शिखरावर गेली होती. सात वर्ष चाललेल्या मालिकेनंतर तिने काही जाहिराती आणि रिअॅलिटी शो केले. बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची ती विजेती ठरली होती.

अशी झाली दोघांची भेट 

जुही आणि सचिन यांची भेट एका टीव्ही शोच्या शूटिंगवेळी झाली. भेटीनंतर पाच महिन्यांत त्यांच्यात प्रेम जुळलं. जयपूरच्या एका महालात दोघांनी शाही विवाह केला. गेल्या वर्षभरापासून दोघांमधले मतभेद तीव्र झाले आहेत. त्यामुळे मुलीसह जुही सचिनपासून वेगळी राहत आहे. लवकरच दोघं घटस्फोटासाठी अर्ज करणार आहेत. मात्र त्याबाबत दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.