महंमद रफी : गायक म्हणून श्रेष्ठ, बाप म्हणून त्याहूनही श्रेष्ठ...

रफी खऱ्या अर्थाने एक बापमाणूस होता.

Updated: Jan 3, 2018, 07:59 PM IST
महंमद रफी : गायक म्हणून श्रेष्ठ, बाप म्हणून त्याहूनही श्रेष्ठ... title=

मुंबई : रफी खऱ्या अर्थाने एक बापमाणूस होता.

सूरांचा बादशाह

महंमद रफी एक श्रेष्ठ गायक म्हणून आपल्याला परिचित आहेत. आपल्या गोड गळ्याने त्यांनी जगभरातल्या रसिकांचे कान तृप्त केलेत. दिवसातली कोणतीही वेळ असो, रफीचं गाणं ऐकलं आणि मनाला ताजेपणा आला नाही, असं कधी होत नाही. 

पालकांच्या अपेक्षाचं ओझं

बऱ्याच वेळा मोठी माणसं आपल्या मुलांनासुद्धा आपल्या य़शाच्या चष्म्यातूनच बघतात. ते आपल्या मुलांनासुद्धा आपल्याच क्षेत्रात करियर करायला लावतात. प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन जन्माला येतं. पण पालक त्यांना स्वत:च्या इच्छेने उमलू देत नाहीत. आपल्या महत्वकांक्षा आपल्या मुलांवर लादल्या जातात.

मुलांचा केला विचार

रफी मात्र याला अपवाद होते. रफी हे नुसते श्रेष्ठ गायकच नव्हते तर एक पिता म्हणूनही श्रेष्ठ होते. आपल्यासारखंच आपल्या मुलांनीसुद्धा गायक व्हावं असा अट्टाहास तर त्यांनी धरला नाहीच. किंबहुना त्यांनी आपला वारसा चालवायला विरोधच केला. मुलांना त्यांनी लंडनला शिकायला पाठवलं. आपल्याला झेपेल अशा क्षेत्रात करियर करू दिलं. त्यामुळेच त्यांची मुलं आज आपल्या उद्योगधंद्यामध्ये यशस्वी आणि आनंदी आयुष्य जगतायेत. इतर अनेक थोरामोठ्यांच्या मुलाप्रमाणे त्यांना अपयशाचं ओझं उचलत निराशेत जगावं लागत नाहीये.

अपवादात्मक बाप

दिवसेंदिवस जीवघेण्या होत जाणाऱ्या स्पर्धेच्या युगात रफीचं मोठेपण खरोखरंच उठून दिसतं. मुलांनी स्वत:च्याच कलाने वाढावं, असं वाटणारा रफीसारखा बाप विरळाच. एकाचा बापाचा आपल्या मुलांना स्वत:च्या इच्छेप्रमाणे जगू देण्याचा मोठेपणा आपल्याला सुखावून टाकतो, त्यांच्या गायकीप्रमाणेच. खरंच रफी एक बापमाणूस होता.