'सुशांतकडे काम नव्हतं हे खोटं, तो महिन्याला दहा लाख रुपये खर्च करत होता'

.... हा खून नाही

Updated: Jun 28, 2020, 11:09 AM IST
'सुशांतकडे काम नव्हतं हे खोटं, तो महिन्याला दहा लाख रुपये खर्च करत होता' title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येचं मुख्य कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पण, शवविच्छेदन अहवालामध्ये मात्र त्यानं गळफास लावूनच आत्महत्या केल्याचं उघड झालं. असं असलं तरीही सुशांतवर असणारं नैराश्याचं सावट आणि काहींच्या म्हणण्यानुसार त्याच्यापुढे असणारी आर्थिक चणचण या गोष्टींमुळेही त्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं म्हटलं गेलं. पण, मुळात सामनामधून संजय राऊत यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांनुसार सुशांतने आत्महत्याच केली असून, हा खून नाही. 

गेल्या काही दिवसांपासून सुशांतची मानसिक स्थिती त्याला अडचणीत आणत होती. ज्यासाठी त्यानं मानसोपचार तज्ज्ञांचीही मदत घेतली होती. या साऱ्यामध्ये राऊतांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दाही मांडला. ज्यामध्ये त्यांनी सुशांतच्या आर्थिक परिस्थितीकडे सर्वांचं लक्ष वेधत मोठा खुलासा केला. 

सुशांतकडे कामाचा अभाव होता ही बाब सध्यातरी खोटी ठरत असल्याचे मांडण्यात आलेले काही संदर्भ देत राऊतांनी त्याची आर्थिक स्थितीही उत्तम असल्याचं सांगत तो महिन्याला जवळपास पाच लाख रुपयांचं घरभाडं भरत असल्याच्या मुद्द्यावर या लेखातून प्रकारशझोत टाकण्यात आला. इतकंच नव्हे, तर त्याच्याकडे असणाऱ्या महागड्या गाड्या आणि महिन्याला त्याच्याकडून होणारा दहा लाखांचा खर्च पाहता तो आनंदात होता, हा मुद्दाही यापूर्वी प्रसिद्ध केला गेल्याचं म्हणत राऊतांनी आणखी एक बाब उजेडात आणली. 

 

 ...तर अभिनेते रोज आत्महत्या करतील; घराणेशाहीचं तुणतुणं वाजवणाऱ्यांना राऊतांनी फटकारलं

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी होणाऱ्या सर्वच चर्चा पाहता त्याच्या खासगी आयुष्यावरच अनेकांनी जास्त लक्ष केंद्रीत केल्याचं पाहायला मिळालं. त्यातही अभिनेत्रींशी असणारी सुशांतची नाती आणि त्यातून सुरु असणाऱ्या सर्व चर्चा पाहता केंद्रबिंदू हे त्याची प्रेमप्रकरणंच ठरत असल्याचा मुद्दा राऊतांनी प्रकारशझोतात आणत आत्महत्येचं मार्केटींग करणाऱ्यांना धारेवर घेतलं.