अरे, हा तर दुसरा अमिताभ! 'क्योंकी सास भी' मधल्या Ronit Roy च्या लेकाचा Latest Video पाहिलात का?

Ronit Roy Son Latest Video: रॉनित रॉय अभिनेता तुम्हा-आम्हाला सर्वांच्याच परिचयाचा (Ronit Roy Gumrah) आहे. त्याच्या भुमिकांचे आपण सगळेचजण फॅन्स आहोत. तुम्हाला माहितीये का की रॉनित रॉयचा मुलगाही त्याच्याएवढाच (Ronit Roy Son Height) देखणा आहे. सध्या त्याचा एक व्हिडीओ (Agastya Roy Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Apr 13, 2023, 05:13 PM IST
अरे, हा तर दुसरा अमिताभ! 'क्योंकी सास भी' मधल्या Ronit Roy च्या लेकाचा Latest Video पाहिलात का?  title=

Ronit Roy Son Latest Video: अभिनेता रोनित रॉय हा ओटीटीमुळे सध्या चांगलाच लाईमलाईटमध्ये आला आहे. एकेकाळी टेलिव्हिजन गाजवणारा हा अभिनेता आता ओटीटीवरही मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरला आहे. दोन वर्षांपुर्वी आलेल्या हॉटस्टारवरील 'द हॉस्टेज' (Ronit Roy News) या वेबसिरिजमधून रोनितला एक वेगळीच ओळख प्राप्त झाली होती. आता तो ओटीटीवर चांगलाच मुरला आहे. सध्या रॉनित रॉयच्या मुलाचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. यामध्ये रॉनित रॉयच्या (Ronit Roy Son) मुलाची 6 फूट आणि 6 इंच उंची पाहून नेटकऱ्यांनी त्याला दूसरा अमिताभ अशी उपमा दिली आहे. त्यामुळे सध्या रॉनित रॉयच्या मुलाची सगळीकडेच जोरदार चर्चा आहे. सध्या त्याचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

रॉनित रॉयचा गुमराह हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी रॉनित रॉयच्या परिवारानं हजेरी लावली होती. यावेळी एकत्र पोझ देताना रॉनित रॉयची बायको नीलम आणि मुलगा अगस्त्या यांनी हजेरी लावली होती. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेमुळे एकेकाळी रॉनित रॉय हा घराघरात पोहचला होता. त्यानंतर 'कसोटी जिंदगी की' या मालिकेतूही त्यानं साकारलेली मिस्टर बजाजची भुमिकाही प्रचंड गाजली होती. 

मुलावरील इतकं प्रेम केल्यानं धन्यवाद 

यावेळी चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर या परिवारानं पापाराझींसाठी पोझ दिली. परंतु यावेळी सगळ्यात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे रॉनित रॉयच्या मुलाची. अनेकांनी या व्हिडीओ खाली काही वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. तेव्हा त्यांना उत्तर देताना रॉनित रॉय म्हणाला की, माझा मुलगा कोणी एबनॉर्मल अथवा स्पेशल नाही तर उंच आणि थोडा लाजराबुजरा आहे. आपल्या मुलाच्या व्हिडीओवर असंख्य सकारात्मक कमेंट्स आल्यानंतर रॉनित रॉयनं सगळ्यांचे आभारही मानले आणि आपल्या मुलाबद्दल असा चांगला विचार केल्यानं त्या कृतज्ञता व्यक्त केली . 

पुन्हा एकदा पोलिसाची भुमिका 

रॉनित रॉयच्या गुमराह या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, मृणाल ठाकूरही आहेत. यामध्ये रॉनित रॉय पुन्हा एकदा पोलिस ऑफिसरच्या भुमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे वर्धन केतकर तर निर्मिती भुषण कूमार यांची आहे. सध्या या चित्रपटाला चांगले रिव्ह्यूजही येत आहेत. 

याआधीही त्यानं' हॉस्टेज' या वेबसिरिजमधून पोलिस अधिकारीची भुमिका निभावली होती. त्यावेळी त्याच्या या भुमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. सध्या त्याच्या गुमराह या चित्रपटाचेही सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे.