Riteish and Genelia Deshmukh यांच्या कंपनीच्या चौकशीचे आदेश

रितेश आणि जेनेलिया यांच्या अडचणीत वाढ; सहकार मंत्र्यांकडून कंपनीच्या चौकशीचे आदेश... रितेश आणि जेनेलिया यांच्या अडचणीत वाढ झाल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.   

Updated: Nov 28, 2022, 03:40 PM IST
Riteish and Genelia Deshmukh यांच्या कंपनीच्या चौकशीचे आदेश  title=

Genelia and Riteish Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या ऍग्रो कंपनीची चौकशी होणार आहे. शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून लातूरच्या एमआयडीसीमधील भूखंड दिल्याचा आरोप भाजपाने केला होता. सहकार मंत्री अतूल सावे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. (Riteish and Genelia Deshmukh company Order of inquiry)

सहकार मंत्र्यांकडून रितेश-जेनेलिया यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. भाजपने कार्यालयाला एक पत्र दिलं होतं. त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. लवकरच दोघांना याप्रकरणी समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. 

रितेश-जेनेलिया यांना चौकशी आदेश दिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रितेश आणि जेनेलिया बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल असल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येक गोष्ट चाहत्यांपर्यंत काही क्षणात पोहोचते. आता रितेश आणि जेनेलिया वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटीबद्दल चिंता वाटत. (riteish deshmukh comedy)

रितेश आणि जेनेलिया यांचा आगामी सिनेमा 
रितेश आणि जेनेलिया लवकरच 'वेड' (ved) सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे 'वेड' सिनेमातून रितेश  दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे, तर जेनेलिया मराठी सिनेसृष्टी पाय ठेवणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं. 

सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर चाहते ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. ( riteish deshmukh and genelia dsouza video)