मुंबई : 2020 साली कोरोनाचं संकट फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात पाहायला मिळालं. या वर्षी अनेकांची आपला जीव गमावला . काहींचा कोरोनामळे मृत्यू झाला. तर काहींचा दिर्घ आजाराने. या संकाटाची झळ फक्त सर्वसामान्य जनतेला बसली नसून सेलिब्रिटींना देखील अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे. 2020मध्ये दिग्गज अभिनेते ऋषी कपूर आणि इरफान खान यांनी अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. हे दोन कलाकार आज आपल्यात नाहीत असा विश्वास आजही चाहत्यांना होत नाही.
मात्र ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी, ते त्यांच्या अखेरच्या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस लवकरच येणार आहे. ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचे नाव 'शर्माजी नमकीन' असं आहे. हा चित्रपट 4 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
4 सप्टेंबर रोजी ऋषी कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे याच दिवशी त्यांचा अखेरचा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'शर्माजी नमकीन चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. चित्रपटासाठी ऋषी कपूर यांच्या भूमिकेचं चित्रीकरणदेखील अर्ध्यावर राहिलं होतं.
ऋषी कपूर यांच्या अर्ध्यावर राहिलेल्या चित्र चित्रपटाचं चित्रीकरण अभिनेते परेश रावल पूर्ण करणार आहेत. या चित्रपटातून एका ६० वर्षीय व्यक्तीची कथा सांगितली जाणार आहे.