अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानानं घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं मानधन!

Rihanna in Anant Ambani and Radhika Merchant Pre-Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंगमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानानं घेतले इतके कोटी

दिक्षा पाटील | Updated: Mar 1, 2024, 03:19 PM IST
अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये परफॉर्म करण्यासाठी रिहानानं घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं मानधन! title=
(Photo Credit : Social Media)

Rihanna in Anant Ambani and Radhika Merchant Pre-Wedding : भारतातील लोकप्रिय बिझनेसमॅन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबाानी आणि राधिकाा मर्चेंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. हा कार्यक्रम जामनगरमध्ये सुरु झाला. या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. दरम्यान, सगळ्यांचे लक्ष हे पॉप स्टार रिहानानं वेधलं आहे. रिहाना काल तिच्या क्रुसोबत खूप सामानासह जामनगरला पोहोचली आहे. तिच्या धमाकेदार एन्ट्रीनं सगळीकडे तिचीच चर्चा सुरु होती. पण या कार्यक्रमासाठी रिहाना किती मानधन घेणार आहे, याची तुम्हाला काही कल्पना आहे का? चला तर जाणून घेऊया तिच्या मानधनाविषयी...

अनंत अंबानीचं हे प्री वेडिंग 3 दिवसांचं आहे. हा कार्यक्रम आज 1 मार्च रोजी सुरु झालं असून 3 मार्च रोजी संपणार आहे. असं म्हटलं जातं की रिहानानं या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी रिहानानं तब्बल  5 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 41 कोटी मानधन घेतलं आहे. इतकी मोठी रक्कम रिहानानं तीन दिवस परफॉर्म करण्यासाठी घेतली आहे. मात्र, रिहानानं खरंच इतकी रक्कम घेतली आहे की नाही याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. दरम्यान, रिहानाच्या क्रुचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रिहानाशिवाय या कार्यक्रमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील डान्स परफॉर्म करणार असल्याचे म्हटले जात आहे. 

रिहानानं या कार्यक्रमाला येणं ही लक्ष वेधी गोष्ट आहे. रिहानासोबत पार्टनर A$AP Rocky देखील कार्यक्रमात हजर राहणार आहे. दरम्यान, या वेन्यूचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रिहाना ही रिहर्सल करताना दिसते. तर दुसरीकडे शेजारच्या बिल्डिंगीमधील लोक डान्स करताना दिसत आहेत. 

हेही वाचा : विक्रमादित्य वैदिक घड्याळाच्या 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जगाला भारतामुळे मिळाली नवी भेट

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिहाना जेव्हा भारतात आली तेव्हा तिच्यासोबत जवळपास पाच ते सहा कंटेनर्स देखील आले. ते कंटेनर्स पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. या सगळ्या कंटेनर्समध्ये तिच्या स्टेज प्रॉप्स आणि सामान पाहायला मिळाले. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x