Tanhaji Box Office Collection : 'तान्हाजी'च्या कमाईत मोठी उसळी; आकडे पोहोचले....

चित्रपटाची एकूण कमाई... 

Updated: Jan 19, 2020, 09:25 PM IST
Tanhaji Box Office Collection : 'तान्हाजी'च्या कमाईत मोठी उसळी; आकडे पोहोचले....  title=
तान्हाजी

मुंबई : tanhaji 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांनी पकडलेला वेग काही केल्या मंदावण्याचं नाव घेत नाही आहे. सलग नवव्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचे आकडे इतक्या उंचीवर पोहोचले आहेत की सध्याच्या घडीला त्याच्या स्पर्धेमध्ये आणखी कोणताही चित्रपट नसल्याचं आता स्पष्ट होत आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी या ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर ठेवले आहेत. या शर्यतीत 'तान्हाजी' एकच स्पर्धक असल्याचं आदर्श यांनी ट्विट करत सांगितलं. नवव्या दिवशी या चित्रपटाने १६.३६ कोटी रुपये इतकी कमाई केली. आतापर्यंत 'तान्हाजी'च्या कमाईचे एकूण आकडे हे १४५.३३ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत, असं या ट्विटमधून सांगण्यात आलं. 

मुख्य म्हणजे कमाईच्या आकड्यांचा वेग असाच राहिला तर, या आठवड्याच्या शेवटी चित्रपटाचा एकूण गल्ला १५० कोटींच्या घरात सहज पोहोचू शकेल. मुख्य म्हणजे कमाईच्या बाबतीत अजय देवगन स्टारर या चित्रपटाने घेतलेली उसळी पाहता प्रभास स्टारर 'बाहुबली'ला 'तान्हाजी' सहज ट्क्कर देईल अशी प्रतिक्रियाही काही चाहत्यांनी दिली आहे. 

दीपिकाच्या 'छपाक' या चित्रपटाला बरंच मागे टाकल्यानंतर आता २०० कोटींची विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ही शौर्यगाथा समाविष्ट होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, येत्या काळत 'तान्हाजी'ला कंगना रानौत स्टारर 'पंगा' आणि वरुण धवनची मुख्य भूमिका असणाऱ्या 'स्ट्रीट डान्सर ३डी'चं आव्हान असणार आहे. त्यामुळे हे आव्हान पेलत पुढे या चित्रपटाची वाटचाल कशी असणार याकडेही साऱ्यांचं लक्ष असेल.