...म्हणून साराकडे करिनाचे विशेष लक्ष

कलाविश्वात साराने अगदी कमी वेळात आपले वर्चस्व स्थापन केले 

Updated: Oct 20, 2019, 12:35 PM IST
...म्हणून साराकडे करिनाचे विशेष लक्ष title=

मुंबई : अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेत्री करिना कपूर खान या दोघांमधील नातं फार चांगलं आहे. त्याचप्रमाणे करिना, साराच्या प्रेरणास्थानी आहे. अमृता सिंग आणि अभिनेता सैफ अली खानची मुलगी साराच्या एका विशिष्ट गोष्टीवर करिनाचे व्ययक्तिक लक्ष असते. साराच्या वॉड्रोबकडे आणि तिच्या फॅशनकडे तिचे विशेष लक्ष असते. कलाविश्वात साराने अगदी कमी वेळात आपले वर्चस्व स्थापन केले आहे. 
  
'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदापर्पण केले. 'सिंम्बा' चित्रपटाच्या दमदार यशानंतर तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. त्याचप्रमाणे सारा आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या नात्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगलेल्या असतात. 

परंतु, काही दिवसांपूर्वी कार्तिकने सारासोबत फोटो काढण्यास नकार दिला होता. मला माझ्या अभिनयामुळे आणि माझ्या कामामुळे ओळखण्यात यावे. मला साराचा बॉयफ्रेंड म्हणून ओळख नको असल्याचे तो म्हणाला. सारा आणि कार्तिक लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून झळकणार आहेत. 

कार्तिक आणि सारा दोघे 'लव आज कल' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये एकत्र झळकणार आहे. अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनवर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे.