रेखा या अभिनेत्यासोबत लग्न करुन घरी गेल्या, तेव्हा सासूने रेखा यांना चप्पल दाखवत मारण्याची धमकी दिली...

अभिनेत्री  रेखा चित्रपटांबरोबरच त्यांच्या वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असायच्या.

Updated: May 12, 2021, 04:38 PM IST
रेखा या अभिनेत्यासोबत लग्न करुन घरी गेल्या, तेव्हा सासूने रेखा यांना चप्पल दाखवत मारण्याची धमकी दिली... title=

मुंबई : सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी फिल्म इंडस्ट्रीत जेव्हा पाऊल ठेवलं होतं. तेव्हा त्या एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. एक काळ असा होता जेव्हा त्या किमान एकावेळी पंचवीस चित्रपटांत काम करत होत्या. त्या दररोज डबल शिफ्टमध्ये काम करायच्या. रेखा चित्रपटांबरोबरच त्यांच्या वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असायच्या. रेखा यांनी मनाशी पक्क केल होतं. जे काही बोलेन ते बिंधास्त बोलेन. जितेंद्र यांचं हृदय तोडणाऱ्या चर्चेनंतर रेखा खूप उदास झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची भेट विनोद मेहरा यांच्या सोबत झाली.

विनोद मेहरा यांनी 1971 मध्ये एक थी रीटा या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. विनोद यांची प्रामाणिकता, कळकळ आणि शांत स्वभाव रेखा यांना फार आवडला होता.

रेखा जिथे बिधांस्त होत्या. तिथे विनोद कमी बोलणारे
रेखा जिथे बिधांस्त होत्या. तिथे विनोद कमी बोलणारे होते . ते एक सौम्य अभिनेता होते. विपरीत स्वभावामुळे दोघेही एकमेकांकडे खेचले गेले. रेखा सेक्ससारख्या विषयांवर उघडपणे बोलायच्या. तर दुसरीकडे विनोद मेहरादेखील आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत होते. सिनेमे हिट झाल्यानंतर विनोद यांच्या आईला त्याच्या लग्नाची चिंता वाटू लागली.

रेखासाठी विनोद मेहरा यांचं पुन्हा एकदा हृदय धडधडू लागलं
आई आणि मुलामध्ये बरंच प्रेम होतं, म्हणून विनोद यांनी आपल्या निवडीचा विचार न करता आईच्या निवडीचा विचार केला. विनोद यांनी मीना ब्रोकासोबत लग्न केलं. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही. दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर रेखासाठी विनोद मेहरा यांचं पुन्हा एकदा हृदय धडधडू लागलं.

तरीही त्यांच्या आईला रेखा यांचा राग
विनोद यांची आई कमला मेहराला खुश करण्यासाठी रेखा यांनीही खूप प्रयत्न केले. पण तरीही त्यांच्या आईला रेखा यांचा राग यायचा. तर दुसरीकडे विनोदनेही रेखा यांना स्वतःमध्ये बदल करुन आणण्यास दाबाव टाकला. रेखा यांना माध्यमांपासून दूर राहण्याचा सल्ला विनोद यांनी दिला. यानंतर रेखा माध्यमांच्या अजून जवळ जावू लागल्या. यामुळे दोघांमध्ये भांडण वाढू लागली.

पण रेखा अगदी याच्या उलट होत्या
चित्रपटामधील सूनेप्रमाणे कमला यांनाही एक सभ्य, पारंपारिक आणि घरगुती सून हवी होती. पण रेखा अगदी याच्या उलट होत्या. लग्नाआधी सेक्सवर केलेलं विधान कमला मेहरा यांना आवडलं नव्हतं. विनोद हळू हळू रेखा यांच्यापासून अंतर ठेवू लागले. रेखा यांच्या हे लक्षात येताच.

आत्महत्या करण्याचा प्रयत्न
रेखा यांनी कॉक्रोज मारण्यावरील औषध प्यायल्या आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बराच गोंधळ उडाला. या घटनेनंतर विनोद मेहरा पूर्ण हादरुन गेले. बातमीनुसार या दोघांचं लग्न कोलकातामध्ये झालं.

रेखा यांचं स्वागत चप्पल दाखवून केलं
जेव्हा विनोद रेखा यांना लग्नानंतर घरी घेऊन गेले, तेव्हा त्यांच्या आईने या दोघांना घरातही जाऊ येवू दिलं नाही. पाया पडण्यासाठी खाली वाकल्याबरोबर कमला मेहरा यांना रेखा यांनी ढकललं. विनोद यांच्या आईने रेखा यांचं स्वागत चप्पल दाखवून केलं.

समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण
विनोद मेहरा यांनी आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण कमला, रेखा यांना कोणत्याही प्रकारे आपली सून म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हत्या. या घटनेनंतर रेखा हैराण झाल्या. 2004 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रेखा यांनी विनोद मेहरा यांच्यासोबत लग्न केलं होतं असं सांगायला देखील नकार दिला.