रेखा यांचा दबदबा आजही कायम, 1 मिनिटांच्या प्रोमोसाठी फी घेण्यांच्या बाबतीत नवख्या अभिनेत्रींना टाकलं मागे

इंडस्ट्री अजूनही 'गुम है रेखा के प्यार में?' फक्त 1 मिनिटाच्या प्रोमोसाठी रेखा यांना सिनेमातील अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन

Bollywood Life | Updated: Aug 6, 2021, 07:10 PM IST
रेखा यांचा दबदबा आजही कायम, 1 मिनिटांच्या प्रोमोसाठी फी घेण्यांच्या बाबतीत नवख्या अभिनेत्रींना टाकलं मागे title=

मुंबई: सौंदर्यच नाही तर आपला अभिनय डान्स आणि गायन अशा तिन्ही गोष्टींसाठी आजही प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखासमोर अनेक नवख्या अभिनेत्रीही फिक्या पडतात असं म्हणायला हवं. आजही त्यांचं सौंदर्यच नाही तर त्यांची कला आणि डान्स चाहत्यांना भुरळ घालतो. त्यांची अदा पाहायला चाहते वेडे असतात. रेखा यांची जादू आजही कायम आहे. रेखा यांनी एका प्रोमोसाठी जेवढी फी घेतली ते ऐकूनच आश्चर्याचा धक्का बसेल. रेखा यांचा हा प्रोमो खूपच व्हायरल होत आहे. 

रेखा जरी सध्या लाइमलाईटपासून दूर असल्या तरी जेव्हा जेव्हा त्या स्क्रीनवर येतात तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतात. 'गुम है किसी के प्यार में'च्या निमित्तानं एका प्रोमोमध्ये रेखा दिसल्या. या प्रोमोमध्ये त्या इतक्या सुंदर दिसत आहेत की त्यांच्यावरून नजर हटत नाही. त्या जे बोलत आहेत त्यांचे प्रत्येक शब्द अगदी काळजाला भिडणारा आहे. एक क्षण असं वाटतं त्याच कोणाच्यातरी प्रेमात हरवल्या आहेत. 

रेखा यांचा हा प्रोमो पाहून पुन्हा एकदा रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रेमाच्या चर्चा डोळ्यासमोर येतात. आजही या प्रोमोमुळे पुन्हा एकदा रेखा यांच्या प्रेमाच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. 

रेखा या प्रोमोमध्ये म्हणतात, 'जे कालपर्यंत कर्तव्य होतं ते आज प्रेमात बदललंय. प्रेम आणि विश्वास एकसाथ कुठे सोबत चालतात. अशा परिस्थितीमध्ये जर आपला भूतकाळ वादळ बनून पुन्हा आपल्या आयुष्यात आला तर... कोमेजलेल्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या होतात. तुम्हाला नको असेल तरीही तुमचं भूतकाळातलं प्रेम आजचं कर्तव्य होतं. '

'जबाबदारी पूर्ण करतात करता अभिनेत्यावर नेमकी काय वेळ येते...' असं रेखा या प्रोमोमध्ये सांगतात. 'गुम है किसी के प्यार में' स्टार प्लसवरील या सीरियलसाठी रेखाने हा प्रोमो केला आहे. त्यांचं सौंदर्य त्यांच्या अदा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेखा यांनी म्हटलेल्या या ओळी नकळत खूप काही सांगून जातात. या प्रोमोची सोशल मीडियावर चर्चा आहे.

ही झलक पाहून या सीरियलमध्ये पुढे काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या प्रोमोनंतर मात्र एक गुपीत समोर आलं आहे. गुम है किसी के प्यार में नव्या प्रोमोसाठी रेखा यांनी जवळपास 5 ते 7 कोटी रुपये फी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

शोशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, 'रेखा जीला समांतर नाही! आपल्या सर्वांना माहित आहे की रेखा यांचा करिष्मा अमर्याद आहे. शोच्या प्रारंभाच्या पहिल्या प्रोमोचा त्या एक भाग होत्या. शोचे शीर्षक बॉलिवूडच्या मधुर गाण्यांपैकी एक आहे आणि हे गाणे त्याच्या हृदयात विशेष स्थान आहे. हे खरोखरच आनंदाची आणि आश्चर्याची बाब आहे की त्या दुसऱ्या प्रोमोचाही एक भाग आहेत.