आलिया भट्टबद्दल अनुराग बासू नेमकं काय म्हणाला ज्यामुळे करिश्मा कपूरची बोलती बंद झाली

एका छोट्या स्पर्धकाने करिश्माला विचारला निरागस प्रश्न .

Updated: Aug 6, 2021, 06:04 PM IST
 आलिया भट्टबद्दल अनुराग बासू नेमकं काय म्हणाला ज्यामुळे करिश्मा कपूरची बोलती बंद झाली title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर 'सुपर डान्सर' या रिअॅलिटी टीव्ही शोमधून गायब आहे. शोच्या या चौथ्या सीझनमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री करिश्मा कपूरने शिल्पा शेट्टीची जागा घेतली आहे. जेव्हापासून करिश्मा कपूर शोमध्ये आली तेव्हापासून स्पर्धक तिच्याशी खूप बोलताना दिसत आहे. अलीकडेच तिच्या एका छोट्या चाहत्याने करिश्माला एक निरागस प्रश्न विचारला.

फॅनच्या प्रश्नाला करिश्माचं उत्तर 
करिश्मा कपूरच्या या चाहत्याने तिला विचारलं की मॅडम, तुमच्या कुटुंबात किती कलाकार आहेत? छोट्या चाहत्याच्या या प्रश्नावर करिश्माचं एक साधं उत्तर होतं. ती म्हणाली खरं तर  मलाही माहित नाही. त्यानंतर करिश्मा कपूरने तिच्या फॅमिली ट्रीची आठवण करत कपूर घराण्याचा अभिमान आणि गौरव असलेल्या सर्व दिग्गजांची नावं घेणं सुरू केलं.

खूप मोठे फॅमिली ट्री
पृथ्वीराज कपूरपासून ते ऋषि कपूर आणि नीतू कपूरपासून ते रणबीर कपूरपर्यंत, करिश्माने तिच्या कुटुंबातील सर्व दिग्गज स्टार्सची नावं घेतली जी तिला आठवत होती. यानंतर, जेव्हा करिश्मा कपूर तिची चर्चा पूर्ण करत होती, तेव्हा तिच्या शेजारी बसलेले जज अनुराग बासूने तिला आठवण करून दिली की ती या यादीत आलिया भट्टचाही समावेश करू शकते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करिश्मा कपूर झाली शांत 
अनुराग बासूच्या या प्रकरणावर करिश्मा काहीच बोलली नाही. ती गप्प राहिली आणि तिने तिच्या तोंडाची 'झिप' बंद ठेवण्याचे एक्सप्रेशन दिले. मात्र, या काळात करिश्मा कपूर हसत राहिली आणि तिच्या हास्याने चाहत्यांना बरंच काही सांगितलं. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत, पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.