ओम पुरी आणि रेखा यांचा हा Bold Scene पाहून, सेटवर असलेले सगळे झाले होते हैराण

रेखा आणि ओम पुरी यांचा हा सीन चर्चेचा विषय ठरला होता. 

Updated: Sep 22, 2022, 04:53 PM IST
ओम पुरी आणि रेखा यांचा हा Bold Scene पाहून, सेटवर असलेले सगळे झाले होते हैराण title=

मुंबई : सदाबहार आणि सुंदर अभिनेत्री रेखा (Rekha) या हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांची डायलॉग डिलिव्हरी, धमाकेदार अभिनय किंवा मग डान्स मूव्हीज असो, रेखा यांचे स्मित हास्य कोणालाही वेड लावू शकते. आजही रेखा यांचे लाखो चाहते आहेत. रेखा यांचे आयुष्य कधीच फार सुंदर असे नव्हते. लाखो हृदयांवर राज्य करणाऱ्या रेखा आजही अविवाहित आहेत. त्या त्यांचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगतात आणि त्यांच्यामुळे अनेक महिलांना प्रेरणा मिळाली आहे. रेखा त्यांच्या आयुष्यात अनेक वादांमध्ये सामील झाल्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकायच्या. त्यांनी एका चित्रपटात अभिनेता ओम पुरीसोबत (Om Puri) दिलेल्या सेक्स सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. 

आणखी वाचा : Koffee With Karan मध्ये हजेरी लावण्यासाठी गौरीनं खर्च केले लाखो रुपये, ड्रेसची किंमत ऐकूण व्हाल थक्क

रेखा यांनी 1997 मध्ये ओम पुरी यांच्यासोबत 'आस्था: इन द प्रिझन ऑफ स्प्रिंग' (Aastha: In the Prison of Spring) या चित्रपटात काम केलं होतं. त्यांची ओम पुरी यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीनं अनेकांना आश्चर्यचकित केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांच्या अपेक्षेनुसार चालला नसला तरी रेखा आणि ओम पुरी यांच्यातील सेक्स सीन्सनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात ओम पुरी यांनी रेखा यांच्या पतीची भूमिका साकारली होती. दोघांनी असे अनेक सीन्स केले, ज्यामुळे सगळेच थक्क झाले. (Rekha And Om Puri Bold Scene)

आणखी वाचा : 'मराठी रॅप सुनने गुज्जू भी ...', तरुणीचा मराठमोळा रॅप सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ; एकदा तुम्हीही ऐकाच

चित्रपटात दोघांमधील एक सेक्स सीन दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये ते खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. रिपोर्ट्नुसार, ओम पुरी आणि रेखा सेक्स सीन शूट करत असताना खूप जवळ आले आणि फिजिकल झाले. ते सीन शूट करण्यात इतके हरवले होते की त्यांच्यामुळे खुर्ची पडणार होती. (Rekha And Om Puri Got Physical While Doing Love Making Scene On The Chair Throwback Thursday) 

आणखी वाचा : Birthday Kareena Kapoor Khan चा पण चर्चा मात्र मलायकाची, पाहा काय म्हणाले नेटकरी

रेखा यांचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी असलेलं अफेअर असून ते एकमेकांच्या प्रेमात असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. या सगळ्या रिपोर्ट्नंतर, अमिताभ यांच्या (Amitabh Bachchan) आणि पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या नात्यावर याचा परिणाम झाला. यापूर्वी, स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी एकदा खुलासा केला होता की, 'मुकद्दर का सिकंदर' चित्रपटात अमिताभसोबतच्या त्यांच्या रोमँटिक सीन्सनं जया इतक्या दुखावली होत्या की ते सीन्स पाहिल्यानंतर रडू लागल्या. 

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

याचविषयी बोलताना रेखा म्हणाल्या होत्या की, 'एकदा मुकद्दर का सिकंदरचा ट्रायल शो पाहण्यासाठी मी संपूर्ण बच्चन कुटुंबाला प्रोजेक्शन रूममधून पाहत होते. जया समोर बसल्या होत्या आणि अमिताभ आणि त्यांचे आई-वडील त्यांच्या मागे होते. मी जसं त्यांना पाहू शकत होते तसं कोणी त्यांना पाहू शकत नव्हतं. आमच्या रोमँटिक सीन दरम्यान, मला त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसत होते.