Bollywood अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसते Asha Bhosale यांची नात, Photo पाहिलेत का तुम्ही?

लांब सडक केस, काळजाचे ठोके उडवणारे सौंदर्य, आशा भोसले यांच्या नातीला तुम्ही पाहिलंत का?  

Updated: Sep 22, 2022, 04:36 PM IST
Bollywood अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसते Asha Bhosale यांची नात, Photo पाहिलेत का तुम्ही? title=

मुंबई : प्रसिद्ध गायिका आशा भोसले (Asha Bhosale) या त्यांच्या गाण्यासाठी खुप प्रसिद्ध आहेत. त्यांची गाणी आजही आवडीने प्रेक्षक ऐकत असतात. याच गाण्यांमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध होत असतात. दरम्यान नेहमीच गाण्यामुळे चर्चेत असणाऱ्या आशा भोसले प्रथमच त्यांच्या नातीमुळे चर्चेत आल्या आहेत. दरम्यान नेमकं त्यांच्या नातीने असं काय केलंय ज्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत, ते जाणून घेऊयात. (asha bhosale granddaughter zanai bhosale beautiful photo viral in social media) 

आशा भोसले यांची 21 वर्षीय नात जनाई भोसले (Zanai Bhosale) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत असतात. नातीच्या याच फोटोमुळे आता आशा भोसले  (Asha Bhosale) चर्चेत आल्या आहेत. तिच्या सौदर्याची नेटकरी कौतूक करत आहेत. इन्स्टाग्रामवर तिच्या अनेक फोटोंवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडतोय.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zanai (@zanaibhosle)

 
जनाई कोणाची मुलगी आहे?
आशा भोसले (Asha Bhosale) यांनी 1949 मध्ये गणपत राव यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर 11 वर्षांनी हे नाते संपुष्टात आले. यानंतर आशा भोसले (Asha Bhosale) यांनी आरडी बर्मन यांच्याशी दुसरे लग्न केले.आनंद भोसले, वर्षा भोसले आणि हेमंत भोसले ही आशा भोसले यांच्या पहिल्या लग्नापासून झालेली मुले आहेत. दुसरीकडे, जनाई भोसले (Zanai Bhosale) ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद आणि त्यांची पत्नी अनुजा यांची मुलगी आहे.

 

'या' गाण्यामुळे प्रसिद्धी झोतात
जनाई भोसले (Zanai Bhosale) हिला गायन आणि अभिनयात रस आहे. तिने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी भारतातील पहिल्या ट्रान्सजेंडर बँडसाठी (6 पॅक बँड) गाणे गायले होते. याच गाण्यामुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zanai(@zanaibhosle)

सोशल मीडियावर असते अ‍ॅक्टीव्ह
जनाई भोसले (Zanai Bhosale) सोशल मीडियावर खुप अ‍ॅक्टीव्ह असते. तिचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 45.2 हजार फॉलोअर्स आहेत. तर ती 552 इंस्टा अकाउंट फॉलो करते. आत्तापर्यंत तिने फक्त 232 पोस्ट केल्या आहेत. याचसोबत जनाईचे एक यूट्यूब चॅनल देखील आहे. तिने हे चॅनल 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान सुरू केले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zanai (@zanaibhosle)

दरम्यान जनाई (Zanai Bhosale) इंटरनेटवरील तिच्या फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. गायणासह तिच्या सौंदर्यावरही चाहते फिदा आहेत.