Ravi Kishan Daughter join defence forces under Agnipath scheme : सेलिब्रिटींप्रमाणे स्टार किड्सही तितकेच चर्चेत असतात. कधी त्यांच्या स्टाईलमुळे, पार्ट्यांमुळे तर कधी त्यांनी केलेल्या कामामुळे. कलाकाराची मुलं कलाकार होतील असे अनेकांना वाटते मात्र, बऱ्याचवेळा त्या मुलांना देखील काही तरी वेगळं करण्याची इच्छा असते. असंच काही तरी भोजपुरी लोकप्रिय अभिनेता आणि भाजप भाजप खासदार रवि किशन यांच्यासोबत झालं आहे. त्याच्या मुलीनं केलेल्या कामानं त्यांना फार आनंद झाला आहे. तर आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की रवी किशन हे का आनंदी आहेत आणि त्यांच्या मुलीनं असं काय काम केलं आहे. तर चला जाणून घेऊया.
रवि किशन यांना एक मुलगी असून तिचं नाव इशिता शुक्ला असं आहे. इशितानं तिचं स्वप्न पूर्ण करत सैन्यात भरती होण्यासाठी सज्ज झाली आहे. सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगली आहे. गेल्या वर्षी रवि किशन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की माझी लेक इशिता शुक्ला, "आज मला म्हणाली की मला अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात जायचं आहे. मी म्हणालो बाळा नक्की जा."
दुसरीकडे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत म्हटले जात आहे की इशिता ही 21 वर्षांची आहे. तर अग्निपथ योजनेंतर्गत इशिता संरक्षण दलात सामिल होणार आहे. ही पोस्ट सेलिब्रिटी फोटोग्राफर विरेंद्र चावलानं शेअर केली आहे. या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी रवि किशन यांना आणि त्यांची लेक इशिताला खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
मेरी बिटिया ईशिता शुक्ला ,आज सुबह बोली पापा I wanna b in #AgnipathRecruitmentScheme I said go ahead beta pic.twitter.com/BkxoOB81QQ
— Ravi Kishan (@ravikishann) June 15, 2022
त्यानंतर आता व्हायरल होत असलेल्या या पोस्टवरून इशितानं तिचं स्वप्न पूर्ण केल्याचे म्हटले जात आहे. इशिता शुक्ला ही कॅडेट आहे. तिने 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवन ते इंडिया गेट येथे होणाऱ्या संचलनातही भाग घेतला होता. त्याबद्दल तिचा गौरवही करण्यात आला होता. आता इशिता लवकरच सैन्यात भरती होणार असल्याने रवी किशन यांचा चाहत्यांना आनंद झाला आहे.
हेही वाचा : ‘गजनी’ फेम अभिनेत्री पतीपासून घेतेय घटस्फोट? पाहा Asin ची पहिली प्रतिक्रिया
दरम्यान, गेल्यावर्षीत मोदी सरकारनं घोषणा केली होती की अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षांसाठी सैन्यात भरती करण्यात येईल. त्यानंतर 75 टक्के सैनिकांना त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण, कोणत्याची राज्याचं पोलीस दल किंवा निमलष्करी दलातील जागांनुसार प्राधान्यक्रमानुसार नियुक्ती दिली जाईल. तर, बाकी जवान स्थायी जागांवर नियुक्त होतील.