Video : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि...

Rashmika Mandanna Video रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. यात ती चुकून दुसऱ्याच्या कारमध्ये बसताना दिसतेयं.....

Updated: Jan 8, 2024, 12:57 PM IST
Video : गलतीसे मिस्टेक! एअरपोर्टवर रश्मिका चुकून दुसऱ्यांच्याच कारमध्ये बसली आणि...  title=

Rashmika Mandanna Video : फक्त साउथ फील्म इंडस्ट्री नाही, तर संपुर्ण चित्रपटसृष्टीत आपल्या सौदर्यानं आणि अभिनयानं सर्वांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहे. रश्मिकाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नॅशनल क्रश रश्मिका मंदाना सोशल मिडीयावर तिच्या फोटो, व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते. तिचा असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. 

रश्मिकाचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. कारण, इथं अनावधानानं जशी सर्वांकडूनच एखादी चूक होते अगदी तशीच चूक या अभिनेत्रीकडूनही झाल्याचं पाहायला मिळत आहे. ही चूक म्हणजे दुसऱ्याच्या कारमध्ये जाऊन बसण्याची. तुमच्याकडून असं कधी घडलंय का? 

 

एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? 

आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री दिसली की, त्यांच्या आजुबाजूला चाहते खूप गर्दी करतात. फोटो, सेल्फी या सगळ्यांच्या नादात कलाकारांभोवती गोंधळ घालताना दिसतात. रश्मिकाचीही एक झलक पाहण्यासाठी , तिच्यासोबत एक फोटो काढण्यासाठी सगळेच खूप उत्सुक असतात. असाच एक चाहत्यांच्या घोळक्यात त्रस्त झालेल्या रश्मिकाचा  व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यात चाहत्यांच्या घोळक्यामुळं गोंधळलेली रश्मिका चक्क भलत्याच गाडीत जाऊन बसताना दिसतेय. 

एअरपोर्टवर बऱ्याचदा सेलिब्रिटी दिसले की त्यांच्याभोवती पापाराजी आणि चाहत्यांचा गराडा दिसतो. रश्मिकासुद्धा यासा अपवाद ठरली नाही. रश्मिका खूप त्रासलेली आणि घाईत असतानाच तिच्या भोवती फोटो काढण्यासाठी अनेकांनीच गर्दी केली. या सगळ्यात ती चुकून दुसऱ्याच कारचा दरवाजा उघडताच तिच्या टीममधील काहीजणांनी तिला, अगं ही आपली कार नाही असं म्हणत भानावर आणलं.  हे ऐकताचं एका क्षणात ती सावध झाली आणि आपली कार नेमकी कुठंय? असा प्रश्न तिनं टीममधील एका व्यक्तीला केला आणि अखेर स्वत:च्या कारच्या दिशेनं ती निघून गेली. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

नुकत्याच आयोजित करण्यता आलेल्या Animal या चित्रपटाच्या पार्टीसाठी रश्मिका मुंबईत आली होती. त्याचवेळी मुंबई विमानतळावर तिच्यासोबत हा प्रकार घडला आणि एका क्षणात तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला. 

दिग्दर्शक संदिप वांगा रेड्डी, रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी, अनिल कपूर, आणि बॉबी देओल हे कलाकार अॅनिमल सक्सेस पार्टीत हजर होते. यावेळी रश्मिका काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. अॅनिमल मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि रश्मिका एकत्र दिसताच चाहत्यांनी आणि पापाराजींनीही त्यांना 'भाभी नं 1', आणि 'भाभी नं 2' अशी हाक मारण्यास सुरुवात केली होती.