मुंबई : ‘इतनी शक्ती हमे देना दाता… या सुरेल प्रार्थनेच्या गायिका पुष्पा पागधरे यांना राज्य सरकारद्वारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दिला आहे.
पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असते. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.
माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंद शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग अशा दिग्गज कलावंताचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने यापूर्वी सन्मान झाला आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुष्पा पागधरे यांच्या नावाची घोषणा केली. आर. डी. बेंद्रे यांच्याकडून पुष्पा पागधरे यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्या मुंबईत आल्या.
गीत, गझल, भजन आणि ठुमरी शिकल्या.आकाशवाणीवरही त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. ‘खून का बदला’, 'बिना माँ के बच्चे’, ‘मुक्कदर का सिकंदर’,'अंकुश' अशा अनेक चित्रपटांमध्ये आणि अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आहेत.